ब्रम्हपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात पुन्हा शेतकरी ठार • 2 दिवसातील तिसरी घटना ; 2 ठार , 1 जखमी

0
32

धानपिकाचे निंदन सुरू असल्याने शेतावर गेलेल्या एका 48 वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज बुधवारी ( 17 ऑगस्ट ) ला दुपारी बारा वाजताच्या सुमारास ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळशेतशिवारात घडली . विलास विठोबा रंधये असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून तो नागभिड तालुक्यातील मेंढा ( किरमिटी ) येथील रहिवासी होता . कालच मंगळवारी ब्रम्हपूरी तालुक्यात एकाच दिवशी पट्टेदार वाघाने एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केले होते तर एका गुराख्याला केल्याची घटना ताजी असतानाच आज ही घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे . ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत अड्याळ गाव असून ब्रह्मपुरी वरून 8 किलोमीटर अंतरावर आहे . अड्याळ शेतशिवारात नागभिड तालुक्यातील मेंढा ( कि . ) येथील निवासी विलास विठोबा रंदये यांची शेती आहे . धानपिकाची लागवड केल्यानंतर त्यांच्या शेतात धानपिकाचे निंदन सुरु होते . त्यामुळे विलास रंदये हे अड्याळ शेततशिवारातील स्वत : च्या शेतावर आज गेले होते . उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत या शेतकऱ्याच्या शेताला लागूनच जंगल भाग आहे . या परिसरात वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा शेतकऱ्यांना आढळून आले आहे . शेतात निंदन सुरु असल्यामुळे टंदये हे शेताची पहाणी करीत होते . शेताला लागून असलेल्या जंगलव्याप्त भागात शेतात उभे होते . दरम्यान त्याच जंगल परिसरात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक त्याचेवर मागून झडप घेतली . यामध्ये तो जागीच ठार झाला . त्याच्या पश्चात पत्नी , 2 मुली , 1 मुलगा , सून असा आप्त परिवार आहे . त्याच्या मृत्यूने कुटूंबावर शोककळा पसरली आहे . या घटनेची माहिती ब्रम्हपूरी वनविभागाला देण्यात आली . लगेच त्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला . त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि शव उत्तरीय तपासणीकरीता पाठविले . या घटनेने अड्याळ

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here