तेवीस वर्षीय उच्च शिक्षित महिला सांभाळत आहे तिन गावाचा कारभार

0
30

पद सांभाळतच रोड , नाली , बांधकाम , शोषखड्डे , ओपन जिम , हॅन्ड पंप असे विविध विकास कामे केले .

ब्रम्हपुरी मुख्यालयापासून अवघ्या दहा कीलोमीटर अंतरावर असलेल्या तुलान मेंढ येथील ग्रामपंचायत सरपंच पदावर असलेल्या कुमारी पुनम मोतीराम कसारे ह्या बि . एस . सी . पदविधर असून घरची परिस्थिती खुप हालाकीची असून देखील सध्या त्यांनी आपले पुर्ण शिक्षण हे ब्रम्हपुरी येथील प्राथमीक शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बि एस सी पदवि चे शिक्षण घेऊन अवघ्या तेवीसव्या वर्षी त्या सरपंचा या पदाचा पदभार सांभाळत आहेत . तुलान मेंढा हे गट ग्रामपंचायत असून त्यात तुलान मेंडा , तुलान माल , धामनगाव हे गाव या ग्रामपंचायत कार्यालयाला जोडले गेले आहे . जवळपास विस वर्षाच्या कालखंडात तुलान माल या गावातील ह्या पहील्याच उच शिक्षित महीला सरपंचा बनल्या असून ही अभिमानाची बाब आहे . सरपंच पुनम मोतीराम कसारे यांचे आई वडील हे मिळेल त्या मोलमजूरीच्या कामावरती जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तसेच ब्रम्हपुरी येथील गुजरी वार्डा येथे छोटासा फळांचा व्यवसाय देखील आहे सरपंच पुनम कसारे ह्या फावल्या वेळात वडीलांच्या फळाच्या दुकानांवर बसून वडीलाला फळे विकुन त्यांना आर्थिक सहकार्य करीत असतात दरम्यान सरपंचा पुनम कसारे पुढे बोलताना म्हणाल्या की , मागील सार्वजीक ग्रामपंचायत निवडणूकीचे आरक्षण जाहीर झाले होते तेव्हा मला कुठलाही गटाची व पक्षाची सरपंचा पदाकरीता ऑफर आली नाही आणी मला सरपंच पदाच्या निवडणूकीला उभे राहचे पण नव्हते परंतु गावातील सर्वांगीण विकास कामा करीता मला धामनगाव , तुलान माल येथील जनतेनी आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाखातर मी सरपंच पदाचा स्वतंत्र फार्म भरला आणि जनतेनी मला भरघोस मताने निवडून पण
आणले . पुनम मोतीराम कसारे ह्या सरपंच पदाच्या दावेदार झाल्या त्यानंतर त्या तुलान मेंडा येथील गट ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला हा प्रवास माझा ईथेच संपला नाही तर ईथून माझा पुढील प्रवास सुरू झाला . काही गावातील राजकारणी लोकांनी ही कुवारी मुलगी आहे ही कीती दीवस सरपंच पद सांभाळनार , कमी वयात काय राजकारणाचा अनुभव , काय गावाचा विकास करणार असे बरेच काही टोमणे मारल्या जात होते मात्र मी या राजकारणी लोकांच्या वायफळ टोमण्यां कडे लक्ष न देता मी माझ्या गावाचा सर्गांगीक विकास कसा करता येईल याकडे जास्त लक्ष केंद्रित केले . एवढेच नाही तर मला ग्रामपंचायतचे कामकाज व आर्थिक व्यवहार समजून घ्यायला जवळपास सहा महीण्याचा कालावधी लागला कुठल्याही कार्यालयीन कामकाजत अडचण निर्माण झाली तर आमच्या ग्रामपंचायतचे ग्रांमसेवक कीशोर अलोने हे माञ नेहमीच मला सहकार्य करीत असतात आज मला माझ्या सरपंच पदाला दीड वर्ष पुर्ण झाले असून जनेतेचे कामे व गावातील विकास कामे करण्यास मी सदैव तत्पर आहे . असे मत तुलान मेंडा गट ग्रामपंचायत च्या सरपंचा पुनम मारोती कसारे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलतांना व्यक्त केले . * मी या गट ग्रामपंचायत सरपंच पदाचा पदभार सांभाला तेव्हा पासून रोड , नाली , बांधकाम , शोषखड्डे , ओपन जिम , हॅन्ड पंप असे विविध विकास कामे ग्रामपंचायत अंतर्गत गावात केली आहेत . शिक्षण आरोग्य उपजिवीका या विषयावरती भर देत या पुढील पाच वर्षांत ग्रामपंचायत अंतर्गत बरेच विकास कामे करू असे आम्हचे ध्येय आहे . सरपंचा कुमारी पुनम मोतीराम कसारे , गट ग्रामपंचायत तुलान मेंडा*

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here