गुजरातच्या अट्टल कार चोर टोळीचा पर्दाफाश …. रामनगर पोलिसांची 24 तासात कारवाई

0
39

चंद्रपुर : – दिनांक २० ऑगस्ट रोजी मनिविरसिंग जयपालसिंग दिल्लर , वय ४४ वर्ष , रा . शास्त्रीनगर , चंद्रपुर यांची ह्युंडाई सेंट्रो कंपनीची गाडी क्रमांक एम एच ०४ सी . ए . ४० ९ २ किमंत १,००,००० / – रूपयाची घरासमोरून चोरी गेली , त्याच दिवशी फिर्यादी नामे पंकज दिवाकर मिश्रा , वय ३७ वर्ष , रा . ब्ल्यू पॅराडाईज हॉटेल , भवाजी भाई शाळे जवळ , चंद्रपुर मारूती सुझुकी कंपनीची वॅगनार गाडी क्रमांक एम एच १२ डी एस ७८४२ किमत ४,00,000 / – रू . ही ब्ल्यु पॅराडाईज हॉटेलचे बाजुचे पार्कींग मध्ये पार्कींग च्या ठिकाणावरून चोरी गेली . दोन्ही फिर्यादीनी वाहन चोरीची रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार अप क्रमांक ८६२ , २०२२ कलम ३७ ९ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला.
दोन्ही गुन्हयांचे गांभीर्य बघता पो.स्टे . रामनगर ठाणेदार पो . नि . राजेश मुळे , गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे , पोउपनि विनोद भुरले व डि.बी. असे गुन्हयांचे घटनास्थळी भेट देवुन , परिसरातील सी.सी.टि.व्ही . फुटेज चेक करीत मुन्हयात वापरलेल्या गाडीचा पाठलाग करीत जुनोना रोड , बाबुपेठ येथे पोहचुन जुनोना रोडवरून गुन्हयात वापरलेली टाटा अट्रोस कंपनीची गाडी क्रमांक एम . एच . जी . जे . ०२ डी . एम . ०५५ ९ ही ताब्यात घेवुन गाडी मालकाचे नाव निष्पन्न करून आरोपी नामे सतनामसिंग प्रतापसिंग बावरी , वय – ३२ वर्ष , रा . शेवला , ता . मेहकर , जि . बुलढाना यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी गुन्हयात चोरून नेलेल्या गाड्या हया बुद्धनगर , बाबूपेठ वार्ड येथुन त्याचे नातेवाईकाचे घराशेजारी ठेवलेल्या आहेत असे सांगितले वरून गुन्हयात चोरून नेलेल्या दोन्ही गाड्या जप्त केल्या . आरोपी सतनामसिंग प्रतापसिंग बावरी , वय – ३२ वर्ष , रा . शेदला , ता . मेहकर , जि . बुलढाना यास विश्वासात घेवुन विचारपुस केले असता त्यानी फरार आरोपी लखनसिंग त्रिपालसिंग सरदार , रा . पोसकोर दरवाजा वडनगर , ता . वडगनगर जि . मैसाना राज्य गुजरात हा गुजरात येथे दारूची तस्करी करण्याकरीता गाडी चोरून नेत असल्याची माहीती दिली . नमुद दोन्ही आरोपीतांवर महाराष्ट्रातील इतर जिल्हयात तसेच गुजरात राज्यात चोरी , घरफोडी तसेच अवैधरित्या दारू विक्रीचे गुन्हे नोंद आहेत . फरार आरोपी लखनसिंग त्रिपालसिंग सरदार , रा . घोसकोर दरवाजा वडनगर , ता . बडगनगर जि . साना राज्य गुजरात याचा शोध घेणे सुरू आहे .
ह्युंडाई सेंट्रो कंपनीची गाडी क्रमांक एम एच ०४ सी . ए . ४० ९ २ किमंत १,००,००० / – रूपये , मारुती सुझुकी कंपनीची वैगन आर , गाडी क्रमांक एम एच १२ डी एस ७८४२ किमंत ४,००,००० / – रूपये व गुन्हयात वापरलेली टाटा अट्रोस कंपनीची गाडी क्रमांक एम . एच . जी . जे . ०२. डी . एम . ०५५ ९ किमंत ७,५०,००० / – रूपये असे एकुण १२,५०,००० / -रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक अरविंद साळवे , उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक श्री . राजेश मुळे , सपोनि हर्षल एकरे , पोउपनि विनोद भुरले , रजनीकांत पुलावार , पेतरस सिडाम , अशोक मरसकोल्हे , प्रशांत शेंदरे , विनोद यादव , किशोर वैरागडे , पुरुषोत्तम चिकाटे , आनंद खरात , निलेश मुडे , पांडुरंग वाघमोडे , सतिश अवथरे , लालु यादव , विकास जुमनाके , हिरालाल गुप्ता , संदिप कामडी , सुजीत शेंडे , विकास जाधव , भावना रामटेके , तसेच सायबर सेल , चंद्रपुर येथील प्रशांत लारोकर , छगन जांभुळे , अमोल सावे यांनी केलेली आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here