तो सकाळी घराबाहेर निघाला आणि परतलाच नाही

0
47

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील जलनगर भागात राहणारा MR 33 वर्षीय मोसीम नईम शेख हा मला गडचिरोली ला काम आहे असे सांगत घरून निघाला मात्र तो आजपर्यंत घरी व गडचिरोली येथे आढळून आला नसल्याने मोसीम यांचा लहान भाऊ मोईन यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये मोठा भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दिली आहे .
मोसीम हा आधी MR म्हणून काम करीत होता , परंतु 2 महिन्यांपूर्वी त्याने नोकरी सोडली त्यांनतर तो घरी राहत होता . 22 ऑगस्टला सकाळी 7 वाजता मोसीम ने पत्नी व लहान भाई नईम ला मी गडचिरोली जात आहे असे सांगून घराबाहेर निघाला . 8 वाजता मोसीम चा मित्र घरी आला व मोसीम कुठे गेला याबाबत विचारणा केली , तर त्याच्या भावाने तो गडचिरोली गेला असल्याचे सांगितले , मोसीम ला यावेळी मोबाईल वर सम्पर्क करण्यात आला मात्र त्याचा मोबाईल घरीच होता . मोसीम सायंकाळी घरी परतणार या आशेवर सर्व त्याची वाट बघत होते , मात्र तो घरी परतलाच नाही , त्याकरिता मोईन ने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली .
मोसीम बाबत कसलीही माहिती मिळाल्यास मोबाईल क्रमांक 7798980807 वर सम्पर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here