चंद्रपूरात आलेल्या पुराला वेकोलीच जबाबदार – आ. किशोर जोरगेवार

0
41

पावसाळी अधिवेशनात मांडला विषयअनेक महत्वांच्या मागण्यांकडे वेधल सभागृहाचे लक्ष

चंद्रपूरच्या इतिहासात पहिल्यांदा एकाच महिण्यात चार दा पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची घटना घडली आहे. याला पुर्णपणे वेकोली प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी पावसाळी अधिवेशनात बोलतांना केला असुन वेकोलीच्या मातीमुळे समतळ झालेले नदीपात्र पुन्हा खोलिकरण करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी सभागृहात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील अनेक महत्वांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. ते यावेळी म्हणाले कि, यंदा चंद्रपूरात झालेल्या पावसाचे प्रमाण इतके अधिक होते की, चंद्रपूरची जिवनदाई असलेल्या इरई धरणाचे दरवाजे २८ वेळा उघडल्या गेले. तब्बल ६ हजार ४६ कुटुंबांचे स्थलातंरण करण्यात आले. चंद्रपूरला आलेल्या पुरात २४ पेक्षा अधिक नागरिकांना जिव गमवावा लागला असल्याचे यावेळी त्यांनी सांगीतले. चंद्रपूरात वेकोलीचे जाळे आहे. वेकोलीच्या खानीने खानीमधुन निघत असलेली माती नदी लगत टाकली. त्यामुळे सदर माती नदीत साचल्याने अनेक ठिकाणचे नदीपात्र समतळ झाले आहे. आणि हेच या पुराचे मुख्य कारण ठरले असुन या पुराला आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीला वेकोली प्रशासनच जबाबदार असल्याचा पूराव्यानीशी आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केला आहे. आता समतळ झालेले नदीपात्र पुन्हा खोल करण्यासाठी खोलीकरण करण्याची मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.

चंद्रपूरात आलेल्या पुराने शहरालगत असलेल्या बेलसनी, पिपरी मार्डा, विचोडा, वडा या गावामध्ये जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने येथे रस्ता आणि पुलाचे निर्माण करण्यात यावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असुन पावसामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना भरिव मदत द्यावी असेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.

ग्रामविकास, शालेय शिक्षण आणि आदिवासी विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलत असतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, पुर्व विदर्भात पुर परिस्थिती नंतर मोठी जबाबदारी ग्रामविकास विभागावर आहे. सततच्या पावसामूळे चंद्रपूरातील शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळांच्या इमरती शतीग्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी बसु शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे लक्ष दयावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. चंद्रपूरमध्ये आदिवासी विभागाचे जात पडताळणी कार्यालय देण्यात आले आहे. मात्र नविन इमारत आणि आवश्यक कर्मचारी देण्याची आवश्यकता आहे. ही व्यवस्था येथे नसल्याने येथील विद्यार्थ्यांना जातीचा दाखला घेण्यासाठी गडचिरोली जिल्यात जावे लागते. त्यामूळे मंजुर झाले असलेल्या जात पडताळणी कार्यालयात कर्मचा-र्यांची नियुक्त करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here