त्या बिबट्याला जेरबंद करा

0
27

बल्लारपुर : मागील एक वर्षापासून जुन्या पॉवर हाउस परिसरात बिबट्याचा वावर सुरू आहे . त्याने शेतकऱ्यांची अनेक पाळीव जनावरे ठार केली व त्या रत्याने ये जा करणाऱ्या नागरिकांवरही हल्ले करू लागला आहे .
आता तो नागरी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांची सुद्धा शिकार करू लागला असल्याने व त्याचे दिवसेंदिवस हल्ल्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याने व नुकतेच त्याने गावातील वार्ड क्र . ५ मध्ये येऊन बकरीची शिकार केल्याने समोर कोणतेही अनुचित घटना घडू नये म्हणून वेळीच विसापूर गावकऱ्यांच्या मागणीची दाखल घेत नव नियुक्त वनमंत्री व चंद्रपूर जिह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बिबट्याला जेरबंद करण्याचा आदेश वन विभागाला दिला . विसापूरच्या या हद्दीत या आज घडीला तालुका क्रीडा संकुल , बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली आहे व ७० ते ८० एकर परीसर हा अजूनही ओसाड पडला आहे .
पडके क्वार्टर , घनदाट झुडपे बारमाही वाहणारा नाला व शेतकऱ्यांची पाळीव जनावरे येथे चरायला येत असल्याने बिबट्याने याच परिसरात आपले बस्तान मांडले आयती शिकार मिळत असल्याने तो बिनधास्त झाला या पूर्वी विसापूरकरांना , क्रीडा संकुल परिसरात बिबट्याचे हल्ले अधून मधून सुरच होते परंतु मागील दोन महिन्यापासून हल्ल्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणत वाढले . आता तो दिवस ढवळ्या नागरी वस्तीत येवून हल्ले करू लागला आहे . याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीने संबधित विभागाशी पत्र व्यवहार करून त्याला जेरबंद करण्याची मागणी केली तसेच बल्लारपूर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष किशोर पंदीलवार व भाजपा युवा मोर्चाचे उपजिल्हाध्यक्ष संदीप पोडे यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना परिस्थितीची जाणीव करून दिली त्यामुळे वनमंत्र्यानी त्याला जेरबंद करण्याचा तात्काळ आदेश दिला . Forest minister बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हद्दीतील पॉवर हाऊस परिसरात बिबट्याच्या हल्यामुळे नागरीकांन मध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली असल्याने त्या बाबत वरिष्ठना त्याला जेरबंद करण्याची परवानगी

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here