पॉलिटेक्निकच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना मिळणार कॅरिऑन, एका महिण्याच्या आत होणार अभियांत्रीकी विभागाची हि परिक्षा आ. जोरगेवार यांची ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी दुरध्वनी वरुन चर्चा, आजच होणार निर्णय

0
50

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर आता पॉलिटेक्निकच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनाही कॅरिऑन देत पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार आहे. सोबत अभियांत्रीक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्याकरिताही एक महिण्याच्या आत परिक्षा घेतली जाणार आहे. याबाबत आज शुक्रवारीच आदेश काढण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. सदर विषयाबाबत आमदार किशोर जोरगेवार यांची ना. चंद्रकांत पाटील यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा झाली आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर पॉलिटेक्निक अभ्यासक्रमातील तृतिय वर्षातील परिक्षेत अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता ऑफलाईन परिक्षा घेण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला होता. मात्र प्रथम वर्ष आणि द्वितिय वर्षातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्याबाबत आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. यावर बोलतांना ना. चंद्रकांत पाटील यांनी सदर विद्यार्थ्यांना दिलासा देणार असल्याचे बोलत पॉलिटेक्निकच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनाही कॅरिऑन देत पुढील वर्षात प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णय घेण्याचे म्हटले आहे.

असाच काहीसा प्रकार अभियांत्रीकी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांबाबतही समोर आला होता. कोरोनामुळे सदर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला होता. मात्र कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यामुळे परिक्षा ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली होती. त्यामुळे याचा निकालावर परिणाम झाला. परिणामी बहुतांश विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. महाविद्यालयात आलेल्या कॅम्पलर्स प्रेसमेंटनेही निकाल अनपेक्षीत लागल्याने विद्यार्थ्यांना  मिळणार असलेल्या नौक-या थांबविल्या. या प्रकाराचीही ना. चंद्रकांत पाटील यांनी दखल घेत एक महिण्याच्या आत अभियांत्रीकी अभ्यासक्रमात अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी परिक्षा घेणार असल्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगीतले आहे. याबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी ना. चंद्रकात पाटील यांचे आभार मानले आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here