थकीत वीजबिल वसुली दरम्यान महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

0
40

– चंद्रपूर – कोरोना विषाणू ची भयंकर महामारीत देशात लॉकडाऊन लागला , या काळात नागरिक घराबाहेर पडले नाही त्यामुळे विजेचा वापर वाढला . कोरोना काळातील वीज बिल थकबाकी माफ करण्याची वारंवार विनंती करण्यात आली मात्र महावितरण ची आर्थिक बाजू कमकुवत झाल्याने त्यांनी विजबिलात कसलीही सवलत मिळणार नाही असे सांगितले .
मात्र राजकीय पुढाऱ्यांनी नागरिकांना वीज बिल भरू नका असे आवाहन केले , विशेष म्हणजे पुढाऱ्यांनी स्वतः घराचे वीजबिल भरले होते .आज अनेक नागरिकांवर विजबिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे , महावितरण वारंवार नागरिकांना विनंती करीत वीजबिल भरण्याचे आवाहन करीत आहे . महावितरणच्याया आवाहन नंतरही नागरिक प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांचे वीज कनेक्शन महावितरण द्वारे कापण्यात येत आहे . आज ही वीज वितरणाचे कर्मचारी वीज बिलाची थकबाकी वसूल करण्यासाठी नागरिकांच्या घरी जात आहे . मात्र अनेकदा वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या अंगावर जात त्यांना मारहाण करण्याचा प्रकार सध्या जोरात सुरू आहे . अशीच एक घटना 25 ऑगस्टला चंद्रपूर शहरातील रयतवारी भागात घडली .रयतवारी येथील डिस्पेन्सरी चौकातील नागेशवर लक्ष्मण कलवल या वीज ग्राहकाकडे 20 हजार 176 रुपयांची थकबाकी वसूल करण्याकरिता गेले होते .नागेश्वर कलवल यांना थकीत वीजबिल भरण्याबाबत महावितरणचे तंत्रज्ञ प्रमोद रणदिवे व स्वप्नील आखरे यांनी विचारणा केली असता त्यांनी थकीत वीज भरण्याबाबत काही सहकार्य केले नाही .नाईलाजाने कर्मचाऱ्यांना कलवल यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केला , वीजपुरवठा का खंडित केला म्हणून अजय नागेश्वर कलवल यांनी अश्लील शब्दात महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत गालावर थापड मारली . जोपर्यंत वीज पुरवठा सुरू करणार नाही तोपर्यंत इथून तुम्हाला जाऊ देणार नाही अशी धमकी दोघांना दिली . दोन्ही कर्मचाऱ्यांनी नियंत्रण अधिकारी प्रतीक कुहीटे यांना सम्पर्क करीत घडलेला सर्व प्रकार सांगत येण्याची विनंती केली . प्रमोद कुहीटे त्याठिकाणी पोहचले असता त्यांच्यासमोर पुन्हा अजय कलवल यांनी अश्लील शब्दात शिवीगाळ करीत रणदिवे यांची कॉलर पकडत धक्काबुक्की केली . घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ रामनगर पोलीस स्टेशन गाठत अजय कलवल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली . पोलीसांनी विविध कलमानव्ये अजय कलवल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here