आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर भुस्खलनाने घर जमीनीत शिरल्याने आर्थिक नुकसान झालेल्या कुटुंबाची यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी भेट घेतली असुन सदर कुटुंबाला जिवनावश्यक वस्तुंची मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे घुग्घुस शहर संघटक विलास वनकर, स्वप्नील वाढई, मुन्ना लोढे, प्रेम गंगाधरे, राजु सुर्यवंशी, इरशाद कुरेशी, उषा अगदारी, नितु जयस्वाल, जोसना मस्के, सुनिता चुने, कामिनी देशकर, वंदना निखारे, सुनिता कोटावार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला प्रमुख व शहर संघटिका वंदना हातगांवकर, सविता दंडारे, सायली येरणे, आशा देशमुख, अल्का मेश्राम, भाग्यश्री हांडे, विमल काटकर, वंदना हजारे, आदींची उपस्थिती होती.
वेकोलिच्या वणी एरिया जवळ असलेल्या अमराई वार्डातील गजाणन मडावी यांचे घर भुस्खलनाने 80 ते 100 फुट जमीनीच्या आत शिरले. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली होती. यावेळी सदर कुटुबांच्या घराचा अर्ध्याहून अधिक भाग जमीनीच्या आत गेल्याने जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सदर कुटुंबाला जिवनावश्यक वस्तुंची मदत करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या घुग्घुस विभागाला केल्या होत्या. त्यानुसार आज यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सदर कुटुंबाला गॅस सिलेंडर शेगडी, अन्नधान्य किट, कपडे, गादी, घरगुती वापरातील भांडे, चादर यासह इतर जिवनावश्यक वस्तुंची मदत केली आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793