Home
Home चंद्रपूर आदिवासी नेते बापुराव मडावी भाजपात! आमदार देवराव भोंगळे यांनी केले स्वागत; कार्यकर्त्यांमध्ये...

आदिवासी नेते बापुराव मडावी भाजपात! आमदार देवराव भोंगळे यांनी केले स्वागत; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.

0
92

===========================

                    हॅलो चांदा न्युज

राजुरा(ता.प्र.):- राजुरा तालुक्यातील प्रमुख आदिवासी नेते, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे माजी जिल्हाअध्यक्ष तसेच आदिवासी विकास प्रकल्प आढावा समितीचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आणि पाचगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बापुराव मडावी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी त्यांच्या गळ्यात भाजपचा दुपट्टा टाकून त्यांचे भाजप परीवारात स्वागत केले. सामाजिक आणि आदिवासी चळवळीत सातत्यपूर्ण सक्रिय असलेल्या बापुराव मडावी यांच्या भाजप प्रवेशाने पाचगांव आणि परिसरात भाजपची ताकद वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास याप्रसंगी बोलतांना आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केला. बापुराव मडावी यांनी आपल्या राजकीय व सामाजिक कार्यकाळात आतापर्यंत आदिवासी समाजाच्या हितासाठी विविध पातळ्यांवर आवाज उचलला असून, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. त्यामुळे आदिवासी भागात विकासाचे कामे करतांना त्यांच्या अनुभवाची निश्चितपणे मदत होईल, असेही आमदार देवराव भोंगळे यांनी म्हटले.

राजुरा येथे झालेल्या या प्रवेशावेळी भाजपचे तालुका महामंत्री वामन तुराणकर, महामंत्री दिलीप गिरसावळे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अजय राठोड, शहराध्यक्ष सुरेश रागीट, माथराचे सरपंच हरीदास झाडे, राधेश्याम अडाणीया, छबिलाल नाईक, दिपक झाडे, प्रदिप मोरे, राहुल सुर्यवंशी, गणेश दुर्गे, प्रकाश हिंगाणे, प्रथमेश्वर रोकडे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती. ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==============================           *हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*                        *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here