*राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा जयंत पाटील साहेब ह्यांच्या उपस्थिती मध्ये आढावा बैठक संपन्न*

0
42

आज दिनांक 29/8/22 ला राष्ट्रवादी काँग्रेस शहर आणि ग्रामीण च्या आढावा बैठक घ्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा जयंत पाटील साहेब चंद्रपूर येथे येणार असताना चंद्रपूर शहराचे जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी चंद्रपूर शहरात एन डी हॉटेल जवळ भव्य स्वागत करण्यात आले त्या वेळी असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ह्या वेळेस मा जयंत पाटील साहेब ह्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले त्या नंतर युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर् ह्यांच्या मार्गदर्शनात युवक शाखेचे उदघाटन मा प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील ह्यांच्या हस्ते करण्यात आले
त्या नंतर जयंत पाटील साहेब जनता महाविद्यालय येथे आढावा बैठकी साठी रवाना झाले
रात्री 9 वा चंद्रपूर शहराच्या बैठकी ला सुरवात झाली
बैठकीची सुरवात शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या प्रास्तविकाने झाली प्रास्ताविक भाषणात राजीव कक्कड ह्यांनी शहरातील संघटन बद्दल तसेच चंद्रपूर शहरात क्रियाशील सदस्य तथा पक्ष सदशय नोंदणी संदर्भात सर्व माहीत प्रदेश अध्यक्ष तसेच निरीक्षक ह्यांना दिली त्या नंतर उपस्तीत पदाधिकाऱ्यांनी आपल्या समस्या जयंत पाटील साहेब ह्यांच्या समोर मांडल्या
सर्वांचे मनोगत ऐकल्या नंतर प्रदेश अध्यक्ष मा जयंत पाटील साहेब ह्यांनी आपले विचार मांडतांना प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी सदस्य मोहिम मोठ्या प्रमाणात राबवावी ह्या करिता मार्गदर्शन केले व पक्ष संघटन मजबुती करीता सर्वांनी मिळून पक्ष कार्य करावे व वॉर्डा वॉर्डा त सदस्य मोहीम राबविण्यात यावी जेणे करून समोर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत यश मिळवता येईल अशा सूचना देण्यात आल्या
आढावा बैठकी दरम्यान निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील साहेब,युवक प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,शहर कार्याध्यक्ष सुधीर कारंगल,माजी अध्यक्ष शशिकांत देशकर,महिला अध्यक्ष शालिनी महाकुलकर, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, ह्यांची प्रमुख उपस्थिती होती
आढावा बैठक दरम्यान युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे,अल्पसंख्याक अध्यक्ष नौशाद सिद्दिकी, विधानसभा अध्यक्ष आकाश निरंटवार,अंजली परकरवार,युवती अध्यक्ष अश्विनी तालपल्लीवार,विद्यार्थी अध्यक्ष कोमिल मडावी,व्यापार अध्यक्ष प्रवीण जुमडे,शिक्षक सेल चे निमेश मानकर, संभाजी खेवले,धनंजय दानव, सलीम शेख,राहुल देवतळे,माधुरी येरने, श्रीनिवास गोस्कुला,तसेच चंद्रपूर शहरातील सर्व पदाधिकारी सर्व सेल चे अध्यक्ष प्रभाग अध्यक्ष,वॉर्ड अध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बहुसंख्य उपस्तीती होती
एवढा वेळ होऊन सुद्धा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आढावा बैठकीत उपस्थित होते ह्या साठी राजीव कक्कड ह्यांनी आभार मानले

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here