मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 विधवा महिलांचा तालुकास्तरीय महिला मेळावा यशस्वी संपन्न.
मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 च्या संसर्गामूळे एक पालक व द्विपालक गमावलेल्या बालकांचे न्याय व हक्क अबाधित राहण्याकरिता विविध लाभापासून वंचित राहीलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मंजूर करण्याकरिता तसेच महिलांना कौशल्य विकास मार्गदर्शनाकरिता दिनांक 06.09.2022 रोजी पंचायत समिती सभागृह, वरोरा येथे दुपारी ठिक 01.00 वाजता तालुकास्तरीय कृतीदल (Task Force) च्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्याचे प्रास्तावीक तहसिलदार वरोरा श्रीमती रोशन मकवाने यांनी केले त्यांनी आपल्या प्रस्तावनेत तालुकास्तरीय कृतीदल समिती कडून वंचित लाभार्थ्यांना तहसिल कार्यालया मार्फत पुढीलप्रमाणे विविध लाभ मंजूर करण्यात आल्याचे सांगितले.
1. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा/संजय गांधी निराधार (विधवा) या लाभार्थ्यांना 50 पैकी 26 पात्र लाभार्थ्यांना लांभ मंजूर करण्यात आला.
2. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 13 पैकी 12 पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला.
3. जमीन मालमत्ता 05 पैकी 04 प्रकरणात फेरफार मंजूर करण्यात आला.
4. बालसंगोपण बाबत 35 पैकी 34 लाभार्थ्यांना लाभ मंजूरकरण्यात आला.
5. शैक्षणिक मदत 50 पैकी 50 लाभार्थ्यांना देण्यात आली.
6. नविन बँक खाती 1 पैकी 1 खाती काढण्यात आली.
7. 1 पैकी 1 चे आधार अपडेशन व आधार लिंक करण्यात आले.
8. 20 पैकी 20 लाभार्थ्यांना प्राधान्य कुटुंब योजनेत समाविष्ट करण्यात आले.
सदर महिला मेळाव्या करिता मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी, चंद्रपूर विदयुत वरखेडकर हया उपस्थित होत्या त्यांनी महिला मेळाव्याचे उदघाटन केले तसेच उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. नायब तहसिलदार (संगायो) मधुकर काळे यांनी विशेष सहाय्य योजनेच्या विविध लाभांबाबत मार्गदर्शन केले. तालुका वैद्यकीय अधिकारी मुंजनकर, पुरवठा विभागाचे नंदकिशोर मांडवकर, सेतू सुविधा प्रमाणपत्र हितेश भालेराव, गटशिक्षणाधिकारी चहारे यांनी शिक्षण विभाग, कृषी मंडळ अधिकारी विजय काळे कृषी मंडळ अधिकारी कृषी विभाग, महिला व बाल कल्यान विभाग तसेच मनरेगा बाबत भोगेकर मॅडम यांचे मार्गदर्शनाचे टेबल लावण्यात आलेले होते.
सदर महिला मेळाव्याला विशेष मार्गदर्शक शशीकांत मोकाशी यांनी उपस्थित महिलांना कौशल्य विकास योजनांची माहिती, अर्थ सहाय्य विषयक माहिती याबाबत मार्गदर्शन केले. या महिला मेळाव्याला अध्यक्ष मा. उपविभागीय अधिकारी वरोरा सुभाष शिंदे हे होते त्यांनी आपले अध्यक्षीय भाषणात वंचित बालकाचे न्याय व महिलांचे हक्क यांबाबत मार्गदर्शन केले
या महिला मेळाव्याला तालुका गटविकास अधिकारी संदिप गोडशेलवार, तालुका कृषी अधिकारी भोयर, कृषी मंडळ अधिकारी काळे तालुका वैद्यकीय अधिकारी मुंजनकर, गटशिक्षणधिकारी चहारे उपस्थित होते, तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी ए.के. मरस्कोल्के यांनी सदर महिला मेळाव्याचे यशस्वी नियोजन केले. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावातील सुमारे 85 महिला लाभार्थी तसेच सर्व सबंधित शासकीय यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793