*राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्याकरिता युवकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा.*

0
33

चंद्रपुर :- गुजरातशी इमानदारी दाखविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्र राज्यातील पुण्यामध्ये होणार असणारा वेदांता गृप व फॉक्सकॉन ची भागीदारी असलेला सेमीकन्डक्टर निर्मीतीचा प्रकल्प गुजरातला हलवण्याचा निर्णयाला मुक संमती दिली आहे.

वेदांत ग्रुप व फॉक्सकॉन कंपनी यांच्या भागीदारीतून वीस बिलियन डॉलर्सची गुंतवणूक असलेला प्रकल्प आज सरकारच्या चाटूगीरी निर्णयामुळे महाराष्ट्राच्या हातातून गेलेला आहे. याचा निषेध करण्याकरिता आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितिन भटारकर यांच्या नेतृत्वात असंख्य युवकांचा निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

हा प्रकल्प जर महाराष्ट्रात झाला असता तर सुमारे वीस बिलियन डॉलर्स म्हणजेच एक लाख अट्ठावन हजार कोटी इतकी भांडवली गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असती त्यातून सुमारे एक लाख पन्नास हजार युवकांना रोजगार मिळु शकला असता. परंतु पहिल्या दिवसापासून कटपुतली सारखे भाजपच्या इशाऱ्यावर नाचणारे व त्यांनी दिलेल्या माईक वरून ते सांगतील तितकेच बोलणारे मुख्यमंत्री सर्व महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे .

२०१४ मध्ये वर्षाकाठी दोन कोटी युवकांना रोजगार देण्याची घोषणा करणाऱ्या भाजप सरकारने अख्या आठ वर्षाच्या त्यांच्या सत्तेतील कारकिर्दीत दोन कोटि तरुणांना रोजगार दिला नाही. याउलट अनेक सरकारी संस्थाचे खाजगीकरन करुण अनेक युवकांना बेरोजगार केले. यावर मात्र भाजपा नेते बोलत नाही.

देशात सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यातून केंद्राला सर्वाधिक जीएसटी दिला जातो मग महाराष्ट्राच्या बाबतीतच जाणीवपूर्वक अशी विरोधी भूमिका केंद्र शासन वारंवार का घेतात याचे उत्तर सुद्गा स्थानिक भाजपा नेते देत नाही.

असे अनेक प्रश्न करीत राज्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करुण देण्याची मागणीसह शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्याकरीता आज राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितिन भटारकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

सदर मोर्च्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड़, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिनव देशपांडे, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष फयाज शेख, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजीत उपरे, अल्पसंख्यांक सेलचे शहर अध्यक्ष नौशाद शेख, रायुकों जिल्हा उपाध्यक्ष तिमोति बंडावार, माजी सरपंच अमोल ठाकरे, कुमार पॉल, विहुल काछेला, कामगार सेलचे उपाध्यक्ष संजय सेजुल, पंचायत समिति सदस्य पंकज ढेंगारे, ग्राप सदस्य अनुकूल खन्नाडे, अंकित ढेंगारे, तालुकाध्यक्ष राहुल आवळे, विधानसभा अध्यक्ष आकाश निराठवार, राविका शहर अध्यक्ष कोमिल मड़ावी, उपाध्यक्ष श्रीनिवास गोसकुला, सचिन मांदाळे, विशाल नायर, नागभीड विधानसभा अध्यक्ष प्रशांत घूमे, वरोरा तालुकाध्यक्ष दिनेश मोहारे, नागभीड प्रशांत गायकवाड, ब्रम्हपुरी अश्विन उपासे, जिल्हा उपाध्यक्ष रोशन फुलझेले ,नितिन घुबड़े, रोशन शेख , आकाश बंडीवार, अश्विन सल्लम, राहुल देवतळे, रोशन कोमरेडिवर, राहुल वाघ, केतन जोरगेवार, मनोज पिपरे, मनोज सोनी, आशिष लीपटे, शुभम बगडे, प्रमोद वावरे, राकेश किनेकर, संदीप बिसेन, सिहल नागराळे, राहुल भगत, सौरभ घोरपड़े, राजकुमार खोब्रागडे, गणेश तमगाडग़े, पंकज देवगड़े, बिट्टू ढोरके, पवन बंदीवार, मानव वाघमारे, विपिन देवगड़े, सतीश मांडवकर, प्रशांत वैरागडे, शुभम ठाकरे, चेतन बावणे, पियुष भोगेकर, अमर गोमासे, रोशन ढवले,धीरज दुर्योधन, नंदु मोंढे, पंकज रत्नपारखी, किशोर सिदाम, विक्की रायपुरे, सिद्धू खोटे, राकेश रापेल्लीवार, चेतन अनंतवार, रितिक मडावी यांच्यासह राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक युवक उपस्थित होते.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here