केंद्रीय मंत्री हरदिप एस पुरी 22 ते 24 सप्टेंबर चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

0
34

भाजपा जिल्ह्यध्यक्ष देवराव भोंगळे यांचे जिल्ह्यतील कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

विश्वगौरव,पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनात व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.जगतप्रसादजी नड्डा यांच्या सूचनेनुसार लोकसभा प्रवास दौरा कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय  आवास शहरी कार्य, पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्री मा.ना. हरदीप एस पुरी पुरीजी आपल्या सोबत विविध विषयांवर संवाद साधण्यासाठी चंद्रपूर दौऱ्यावर 22 ते 24 सप्टेंबर येणार आहे. दिनांक 22 सप्टेंबर सायंकाळी 7 वाजता modi@20 या कार्यक्रमाला प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे मा.केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहे.

या बैठकीला प्रामुख्याने मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री,वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य तसेच माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर हे केंद्रीय मंत्री ना.हरदिपसिंह एस. पुरी सोबत जिल्ह्यातील दौऱ्यात उपस्थित राहणार आहे.

श्री.राजेश बकाने लोकसभा प्रभारी व श्री.देवराव भोंगळे भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांनी केंद्रीय मंत्री महोदयांच्या दौऱ्यातील होणाऱ्या कार्यक्रमाला जिल्ह्यतील सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here