चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल सरावाकरिता उपलब्ध होणार

0
40

: चंद्रपूर दि . 22 सप्टेंबर : जिल्हा क्रीडा संकुल येथील क्रीडा सुविधेत वाढ करण्याकरिता शासनाकडून प्राप्त 12 कोटी रु . अनुदानातून 400 मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक स्मार्ट धावनपथ , नॅचरल ग्रास फुटबॉल मैदान व मुला – मुलींच्या चेंजिंग रूमसह प्रसाधनगृह आदी बांधकाम चंद्रपूर , सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले होते .त्यानुसार मुख्य सुविधा पूर्ण झालेल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दि . 17 ऑगस्ट 2022 रोजीच्या प्राप्त पत्रान्वये या विभागास सुविधा हस्तांतरण करण्याबाबत कळविण्यात आले आहे .परंतु समितीचे वास्तू शिल्पतज्ञ यांनी पूर्ण झालेल्या क्रीडा सुविधांची तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आहे किंवा कसे ? याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता काही बाबी अपूर्ण असल्याचे आढळून आले . यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराने 8 दिवसात अपूर्ण बाबी पूर्ण करून देण्याबाबत क्रीडा कार्यालयास अवगत करून दिले . परिपूर्ण झालेल्या क्रीडा सुविधा प्रत्यक्ष ताब्यात घेण्याबाबत जिल्हा क्रीडा संकुल समितीचे उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दि . 7 सप्टेंबर रोजी मान्यता प्रदान केली . सदर अपूर्ण क्रीडा सुविधा कंत्राटदारामार्फत लवकरात लवकर पूर्ण करून सर्व क्रीडा सुविधा ताब्यात घेऊन तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागास पाठविण्यात येत आहे . सुविधा अपूर्ण असल्यामुळे 20 सप्टेंबरपर्यंत क्रीडा अधिकारी कार्यालयाने क्रीडा सुविधा ताब्यात घेतल्या नाही . त्यामुळे सदर सुविधांचे खेळाडूंना सरावाकरिता मैदान उपलब्ध करून देण्यास नकार दिला हे चुकीचे आहे , असे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव अविनाश पुंड यांनी प्रसिद्धीपत्रकांन्वये कळविले आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here