शेतकऱ्यांनी बँकेचा विविध योजनांचा लाभ घेऊन जीवनात आर्थिक क्रांती आणावी

0
40

खासदार बाळू धानोरकर : मध्यवर्ती बँकेचा स्थानांतरण सोहळा संपन्न

यवतमाळ : ग्रामीण भागातील आर्थिक टंचाई दूर करणारी यंत्रणा म्हणून मध्यवर्ती बँकेचा प्रामुख्याने उल्लेख येतो. शेतकऱ्यांनी आर्थिक प्रगती करण्यासाठी अटल पेंशन, जनधन बँक खाते, विमा खाते, किसान क्रेडिट कार्ड खाते, बँक कर्ज परत फेड योजना अशा शेतकऱ्यांनी बँकांच्या विविध योजनांचा सुयोग्य लाभ घेऊन आपल्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणावी, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.

ते मध्यवर्ती बँकेच्या स्थानांतरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी माजी आमदार वामनराव कासावार, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष टीकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, ऍड. देविदास काळे, विभागीय अध्यक्ष राजू येलट्टीवार, झरी तालुका काँग्रेस अध्यक्ष आशिष कुलसंगे, जेष्ठ संचालक प्रकाश मानकर,संचालक आशिष लोणकर, काँग्रेस महिला अध्यक्ष वंदना आवारी, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संगीता खाडे, शहर सरचिटणीस सुरेखाताई वडिचर, तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम आवारी, माजी तालुका अध्यक्ष वंदना धगडी यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, देशाची व राज्याची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे. आर्थिक स्थिती बळकट करण्याकरिता योग्य नेतृत्वाची गरज असते. ते नेतृत्व सध्या दिसून येत नाही. एकेकाळी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या काळात जगावर आर्थिक मंदीचे संकट कोसळले होते. त्याचे पडसाद त्यावेळी भारतावर आले नाही. परंतु आता कुठलेही संकट नसताना देशातील महत्वाचा संस्था विकावे लागत आहे. हि बाब अतिशय गंभीर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here