शहारत मध्यरात्री घडला हत्येचा थरारा

0
46

चंद्रपूर – 22 सप्टेंबर ला मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यात फोन वाजला आणि एकच खळबळ उडाली . पुढून आवाज आला की पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर एकाची हत्या करण्यात आली आहे . क्षणाचाही विलंब न करता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले . बालाजी वार्डातील रासेकर यांच्या घरी 44 वर्षीय मनोज रासेकर यांचा मृतदेह पडला होता . कुटुंबियांनी सांगितले की काही अज्ञातांनी मनोज ला मारले . पोलिसांनी चौकशी सुरू केली मात्र ती हत्या की आत्महत्या याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह उभा आहे . असेच एक प्रकरण भिवापूर वार्डात घडले होते , त्या गुन्ह्यात सुद्धा या प्रकारे साम्य आहे , पण त्या प्रकरणी भावाने भावाला ठार मारले होते . आता या प्रकरणात कुणी मारेकरी आहे की नाही याचा शोध शहर पोलीस स्टेशन घेत आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here