*चंद्रपुरातील मध्यरात्री खुनाचा प्रियकर शिक्षक खुनी स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दापाश्*

0
130

चंद्रपूर – प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढत त्या घटनेला चोरीच्या प्रकरणात रूपांतर करणाऱ्या पत्नीला व तिच्या प्रियकराला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने 24 तासाच्या आत अटक केली .
22 सप्टेंबरला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी वार्डातील विश्वकर्मा चौकात राहणाऱ्या मनोज रासेकर याचा घरी अज्ञात चोरांनी लूटमार करीत हत्या केली अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली होती , मध्यरात्री 1.30 ते 2 वाजेदरम्यान ही घटना घडली , घटनेचे गांभीर्य बघता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यां घटनास्थळी भेट देत सदर प्रकरणाचा तात्काळ छडा लावण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेला दिले . पत्नीच्या व आईच्या साक्षवरून मध्यरात्री एक अज्ञात इसम घरात आला व पैसे व दागिन्यांची मागणी केली व मनोज रासेकर याचा उशीने दाबून खून केला . यावेळी मृतकाची आईसुद्धा त्यावेळी हजर होती . मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला . स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सपोनि जितेंद्र बोबडे व संदीप कापडे यांच्या नेतृत्वात पथक तयार केले . • याबाबत सायबर सेलची मदत घेण्यात आली , तांत्रिक बाबीत व गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली . मृतकाची पत्नी सुनीता हिचे मुलीच्या शाळेतील शिक्षकसोबत ओळखी होत , प्रेमसंबंध जुळले होते , प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या मनोज चा काटा कसा काढायचा याचा कट रचला गेला . मनोज हा मागील 15 दिवसापासून आजारी होता , त्याचा खून करीत तो आजारपणामुळे दगावला असे सुनीता ला दाखवायचे होते . दिवस ठरला 22 सप्टेंबरला मध्यरात्री आरोपी शिक्षक स्वप्नील गावंडे हा मनोज च्या घरी आला व उशीने मनोज चे तोंड दाबले , मात्र त्यावेळी दोघांची झटापट झाली , आवाज ऐकून मृतकाची आई मनोज च्या रूमकडे आली , आता आपलं बिंग फुटणार असे समजताच सुनीता ने चोरीचा बनाव करीत रूममधील सामान अस्तव्यस्त केले , व आरोपी स्वप्नील ने मृतकाची पत्नी व आईकडून सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला . प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या आजारी पतीचा काटा काढण्याचा प्रयत्न जरी यशस्वी झाला असला तरी मृतकाच्या आई मुळे हे बिंग अखेर फुटले . स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी आरोपी 34 • वर्षीय स्वप्नील ताराचंद गावंडे , रा . घुटकाला चंद्रपूर व 35 वर्षीय सुनीता मनोज रासेकर यांना ताब्यात घेतले सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे , संदीप कापडे , संजय आतकुलवार , संतोष एलकुलरवार , , संतोष रायपुरे , रवी पंधरे व सायबर सेलचे मुजावर अली , अमोल सावे , वैभव पत्तिवार व उमेश रोडे यांनी केली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here