*खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्यांच्या प्रयत्नाने मिळाली पोचमार्गावरील पुलाला संजीवनी*

0
47

*खासदार बाळू धानोर VGकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते ३,९२,८७,७२३ निधीच्या कामाचे भूमिपूजन*

चंद्रपूर : अनेक वर्षांपासूनच्या लहान पूल असल्याने पावसाळयात शेकडो गावांच्या संपर्क तुटला जातो. हि बाब अत्यंत गंभीर असून आरोग्य व इतर सोई सुविधा उपलब्ध करून देणे कठीण होत असते. असाच एक वरोरा तालुक्यातील पुलामुळे देखील शेकडो गावांतील ग्रामस्थांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. हि बाब लक्षात येताच खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पाठपुरावा करून ३,९२,८७,७२३ निधी उपलब्ध करून पोचमार्गावरील पुलाला संजीवनी मिळाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील केंद्रीय मार्ग निधी सन २०२१- २२ अंतर्गत कोंढा – पाटी – माजरी – दहेगाव- डोंगरगाव ते प्रतिमा -५ रस्त्यावर प्रजिमा -९ सा. क्र. ४१ / ०० मध्ये दहेगाव गावाजवळील पुलाची पोचमार्गासह पुर्नबांधणी करण्याच्या कामाला तीन कोटी ९२ लक्ष ८७ हजार ७२३ रुपये निधी खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नाने मंजूर झाले. आज या कामाचे भूमिपूजन खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. .

यावेळी सरपंच विशाल पारखी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता मेढे, शाखा अभियंता सारिखा,सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, उपसरपंच कविता गुगल, ग्रामसेवक पी. एम. लांजेवार, युवक तालुका अध्यक्ष प्रफुल असुटकर, जेष्ठ काँग्रेस नेते जगलू पाटील साळवे, गजानन मावळे, विठ्ठल बुधाने, सागर चिंचोलकर, योगेश लोहकरे यांची उपस्थिती होती.

पुढे देखील लोकसभा क्षेत्रातील असे जे पूल पाण्याखाली जाऊन शेकडो गावांच्या संपर्क तुटत असतो. अशा पुलाचा कामांना निधी
उपलब्ध करून देण्यात येणार
असल्याचे याप्रसंगी खासदार
बाळू धानोरकर यांनी सांगितले.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here