भद्रावती व परिसरातील ग्रामीण भागात स्त्रियांच्या आरोग्य संबंधी विशेष करून स्त्रियांमध्ये होणारे कॅन्सर या संबंधी जागृती,निदान व उपचार या साठी केलेल्या भरीव कामाची दखल घेत ‘suvach’ या आंतररा्ट्रीय संस्थेने भद्रावती येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया विवेक शिंदे यांचा जयपूर येथे दिमाखदार सोहळ्यात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मेडल , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या कामाचा गौरव करण्यात आला.
विशेष बाब म्हणजे अवघ्या महाराष्ट्र मधून फार कमी लोकांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली.
डॉ. प्रिया शिंदे यांनी आपल्या यशाचे श्रेय कुटुंब,सहकारी,गुरुजन व रूग्ण यांना दिले व या प्रसंगी आपण या पुढे सुद्धा ग्रामीण स्त्री आरोग्य संबंधी कामात आपले योगदान देत राहू असे नमूद केले.
त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793