घुटकाळा येथे तिन मजली इमारत कोसळली, आमदार किशोर जोरगेवार यांची घटनास्थळी भेट

0
64

अधिका-र्यांना सुचना, पिडीत कुटुंबाला केली आर्थिक मदत

घुटकाळा वार्डातील जिर्ण अवस्थेत असलेली इमारत कोसळल्याची घटना आज दुपारी दिड वाजताच्या सुमारास घडली. सदर घटनेत शाहिस्ता खान नामक महिला मल्याम्याखाली दबल्या गेली होती. घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी मलब्याखाली दबलेल्या महिलेला वैद्यकीय मदत करण्याच्या सुचना अधिका-र्यां आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या असुन पिडीत कुटूंबाला आर्थिक मदत केली आहे.
घुटकाळा वार्डात पटेल नामक तिन मजली ईमारत आहे. सदर इमारतीचे बांधकाम जुने असल्याने इमारत जिर्ण झाली होती. या इमारतीत शेख कुटुंबीय वास्तव्यास आहे. मात्र आज दुपारच्या दरम्यान इमारत खाली कोसळली या घटनेत शाहिस्ता खान नामक महिला इमारतीच्या मलब्या खाली दबल्या गेली. या घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने सुरु होते. काही वेळात महिलेला सुखरुप बाहेर काढण्यात आले. यावेळी सदर महिलेला शक्य ती वैद्यकीय मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित अधिका-र्यांना केल्या असुन पिडीत कुटंुबाला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आर्थिक मदत केली आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्प संख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here