*भाऊच्या दांडिया मुळे अनेकांच्या सांस्कृतिक आयुष्याला कलाटणी*

0
45

*गरिबीतून पुढे आलेल्या तरुणांनी जिंकली बक्षिसे*

चंद्रपूर : शहरात पहिल्यांदाच भव्य स्वरूपामध्ये खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत आयोजित भाऊच्या दांडीयात चंद्रपूर शहरातीलच नव्हे तर लगतच्या अनेक शहरातून आलेल्या तरुण तरुणींच्या कलागुणांना वाव मिळाली. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या तरुणांनी देखील सहभाग घेत यातून बक्षीस आणि रोख रक्कम जिंकली. खासदार बाळू धानोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नवरात्री उत्सवातील दांडिया मुळे सांस्कृतिक क्षेत्रात नवी कलाटणी मिळाली आहे.

यावेळी विजय उमेदवारांना ई बाईक व रोख बक्षिसे देण्यात आले. त्यात साहिल आत्राम व वेदांती घाटे हे चॅम्पियन बक्षिसाचे मानकरी ठरले असून त्यांना प्रत्येकी ई- दुचाकी बक्षीस स्वरूपात मिळाले आहे. दांडियाचा राजा आणि दांडियाची राणी म्हणून आदित्य राठोड व आर्यां कोहपरे यांना रोख प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस तर एकल दांडिया नृत्य मध्ये दादू डोंगरे, श्रीया आस्कर यांना प्रत्येकी ३३,३३३ र्योते रोख बक्षीस व ट्रॉफी देण्यात आली. दांडिया ग्रुप मध्ये पहिला पुरस्कार रंगसीया, दुसरा पुरस्कार जय अंबे तर तिसरे पारितोषिक मृदुम रूपने पटकाविला. लहान मुलांमध्ये पहिले पारितोषिक खिलंन शाहा, त्रिशा उराडे यांनी पटकाविले. त्यासोबतच अन्य पुरस्कार देखील याप्रसंगी देण्यात आले. त्यासोबतच यावेळी दांडियात सहभागी महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा पैठणी देऊन खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विनोद दत्तात्रय, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, भाजपचे माजी नगरसेवक सुभाष कसनगोट्टूवार, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, महिला काँग्रेस नेत्या चित्रा डांगे, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, काँग्रेस नेते घनश्याम मुलचंदानी, कृषी उत्पन्न माजी सभापती दिनेश चोखारे, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, माजी नगरसेवक सुनीता अग्रवाल, ओबीसी नेते उमाकांत धांडे, रेल्वे उपभोक्ता सलाहकर समिती सदस्य राज यादव, सेवादल महिला पदाधिकारी स्वाती त्रिवेदी, राधिका तिवारी – बोहरा, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते सचिन कत्याल, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, सुरज बोबडे यांची उपस्थिती होती.

भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध जाती, धर्म, परंपरा आणि संस्कृतींना जोडणारा दुवा म्हणजे सण आणि उत्सव. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भाऊच्या दांडीयात दहा दिवस चालेल्या या दांडियात सर्वपक्षीय नेते, डॉक्टर, समाजात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर यांनी एका व्यासपीठावर हजेरी लावून एकात्मतेचा संदेश दिला.

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर आणि वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवून दांडियाची शोभा वाढवली होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here