जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्जा साठी आदिवासी सोसायटी जिवती आणि माराईपाटन सोसायटी येथे पीक कर्जासाठी अर्ज केला आहे अर्ज करून दोन ते तीन महिने झाले आणि शेतकऱ्यांनी वारंवार सोसायटीचे आणि सी डी सी बँक जिवती व सी डी सी बँक टेकामांडवा या ठिकाणी चकरा मारले शेवटी बँक आणि सोसायटी यांनी आता पिक कर्ज वाटपाची तारीख संपली आहे आता पिक कर्ज मंजूर होत नाही असे सांगून शेतकऱ्यांना निराश केले अर्जदार शेतकऱ्यांनचे पूर्ण दस्तऐवज तपासण्यात आले आहे आणि दस्तावेज अधिकृत असून सुद्धा काही शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात आले नाही बँकेचे अधिकारी, निरीक्षक, सोसायटीचे बाबू यांच्या काम चुकार पना मुळे काही शेतकऱ्यांना पीक कर्जापासून मुकावे लागले म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष जिवती हकानी शेख यांनी पीक कर्ज वाटप करण्याबाबत माननीय तहसीलदार जिवती यांना दिनांक ०६/१०/२०२२ रोजी निवेदन दिले आहे तरीपण निवेदनाची दखल घेण्यात आली नाही म्हणून आपणास विनंती करण्यात येत आहे की आपण स्वतः चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि पीक कर्जाची मुदत वाढ करून त्वरित पीक कर्ज वाटप करावे यासाठी निवेदन देण्यात आले. शेतकरी आज शेती भांडवलासाठी त्रस्त असताना अशा प्रकारची प्रशासनाकडून शेतकऱ्यांची हेळसांड करणे हे अशोभनीय आहे.त्यामुळे त्वरित कर्ज वाटपाची कार्यवाही करण्यात यावी यासाठी निवेदन देताना दिलीप रामेडवार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, राहुल बालमवार चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, मंदिप रोडे जिल्हाध्यक्ष, हक्कानी शेख तालुकाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793