वेकोली तर्फे 1500 लोकांना नोटीस

0
45

चंद्रपूर शहरातील बाबूपेठ,बाबा नगर,लालपेठ महाकाली कॉलरी तसेच इतर परिसरातील किमान 1500 रहिवाशांना wcl तर्फे घर खाली करण्याचे नोटीस देण्यात आले
सदर रहिवासी हे गेल्या 50 वर्षा पासून वास्तव्य करीत असून wcl चे कोणतेही नवीन प्रोजेक्ट नसताना नागरिकांना नोटीस देऊन अन्याय करीत आहेत
आणि ह्या मध्ये सत्ताधारी पक्षाचा काही तरी राजकीय हेतू दिसून येत असल्याचा आरोप पत्रकार परिषद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांनी केले
आलेल्या नोटीस चे रीतसर उत्तर देऊन नागरीकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस खंबीर पणे पाठीशी उभी राहणार असे आश्वासन पत्रकार परिषदेत जनतेला देण्यात आले
Wcl च्या विरोधात असलेले संपूर्ण पुराव्या सहित पत्रकारांना हाईकोर्ट व सुप्रीमकोर्ट च्या दस्तावेज पत्रकारांना देण्यात आले
सदर पत्रकार परिषदेत विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे,माजी नगरसेवक विनोद लाभणे,संभाजी खेवले, अभिनव देशपांडे,रमेश दुर्योधन, राहुल वाघ तसेच अन्यायग्रस्त नागरिक उपस्तीत होते

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here