डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

0
31

दि. १५/१०/२०२२ रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती कार्यक्रमाच्या अनुषंगाने तसेच शासनाचे निर्देशित उद्दीष्ट वसतीगृहातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व उद्योजकीय मार्गदर्शन व्हावे, या उद्दीष्ठास अनुसरुन कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. प्रविण लंके, गृहपाल, आणि उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. शशिकात मोकासे, प्रेरणादायी उदयोजकीय मार्गदर्शक तसेच विद्यार्थी प्रमुख वरिष्ठ विद्यार्थी कु. परमात्मा पंधरे हे या कार्यक्रमास लाभले.

या कार्यक्रमात वसतीगृहातील संपुर्ण विद्यार्थी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता. त्यावेळी प्रथम सत्रात कु. विशाल गेडाम, कु. क्रिश कुळमेथे, कु. गणेश हनवते, कु. समेघ जुमनाके यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाला विशेष मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री. शशिकांत मोकाशे सर यांनी “उद्योजकता मानसिकता घडवीने व स्पर्धापरिक्षा आणि आजची परिस्थिती” या विषयी सखोल असे प्रेरणादायी उद्दीष्ठे निर्माण करणारे मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातश्री. प्रविण लंके यांनी विद्यार्थ्यांना “ज्ञानाची भूक ठेवून आयुष्यभर यशाची पायरी कशी गाठता येईल”, या बद्दल सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. श्रेयस तलांडे तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. रंजन सावसाकडे तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निवास कक्ष क्र. १४ चे विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन जयंती कार्यक्रम यशस्वी केला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here