Home
Home चंद्रपूर *‘अनाथ सेवा सदन व वृद्धा सेवा सदन’* *अनाथ व वृद्धांनसाठी अविरत...

*‘अनाथ सेवा सदन व वृद्धा सेवा सदन’* *अनाथ व वृद्धांनसाठी अविरत सेवा प्रदान करित आहे*

0
89

नकोडा गावात अनाथांना व वृद्धांना सेवा प्रदान करीत असलेली सहारा बहूउद्देशीय संस्था, नकोडा द्वारा संचालित अनाथ सेवा सदन व वृद्धा सेवा सदन अनाथ बालके व वृद्धांना अविरत सेवा प्रदान करून त्यांचे पालन पोषण करीत आहे. सदर संस्थेचे अध्यक्ष सुनील जुमनाके व त्यांची संपूर्ण टीम यांचा निस्वार्थ सेवा हेतू मुळे आज नकोडा गावात अनाथ व वृद्धांची सेवा करण्याचा त्यांना लाभ मिळत आहे.
दिवाळीच्या उत्सवात अनाथ सेवा सदन व वृद्धा सेवा सदनला वेकोली क्षेत्रात कार्यरत असणारे श्री जगन्नाथ जेणेकर व त्यांचा परिवारांचा वतीने ब्लान्केट चे वाटप करण्यात आले. सदन येथे असलेल्या बालकांना व वृद्धांना येणाऱ्या थंडीतून बचाव व्हावा या उद्देशाने जेणेकर परिवारांनी हा उपक्रम राबविला.
अनाथ सेवा सदन व वृद्धा सेवा सदन नकोडा येथील तेलगु हायस्कूलच्या बाजूला स्थापित करण्यात आले आहे. येथील अनाथ बालके व वृद्धाच्या सेवेत सदैव तत्पर असणारे सुनील जुमनाके व त्यांच्या संघ अविरत सेवा प्रदान करीत आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here