राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या माध्‍यमातुन गुरूनानक देव यांच्‍या ५५३ व्‍या जयंतीनिमीत्‍त शिख समाजाच्‍या रॅलीचे भाजपा चंद्रपूर महानगरातर्फे भव्‍य स्‍वागत !

0
43

शिख धर्मीयांचे पहिले गुरू गुरूनानक देव यांच्‍या ५५३ व्‍या जयंती पर्वानिमीत्‍त चंद्रपूर महानगरामध्‍ये भव्‍य मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीचे भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरतर्फे लोकमान्‍य टिळक शाळेजवळ हार-तुरे टाकुन भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले.

गुरूनानक देव हे शिख धर्माचे संस्‍थापक गुरू आहेत. बंधूभाव, एकात्‍मता, सलोखा आणि शांततेचा संदेश देत त्‍यांनी असीम मानवतेची शिकवण देत मानवतावादाचा प्रचार-प्रसार केला आहे. त्‍यांचा जन्‍म कार्तीक पोर्णिमेला झाला होता. त्‍यांच्‍या जयंती प्रित्‍यर्थ चंद्रपूर शहरातील गुरूद्वारा गुरूसिंग सभा महाकाली वार्ड येथुन भव्‍य मिरवणूक शिख बांधवांनी काढली. या मिरवणूकीचे राज्‍याचे वने, सांस्‍कृती कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या माध्‍यमातुन भाजपा चंद्रपूर महानगर शाखेच्‍या वतीने लोकमान्‍य टिळक शाळेजवळ भव्‍य स्‍वागत करण्‍यात आले. यावेळी मिरवणूकीतील शिख बांधवांचे फुलांचा हार टाकुन स्‍वागत करण्‍यात आले. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यातर्फे लस्‍सी, बुंदी, शेव वितरण शिख बांधवांना करण्‍यात आले. ही मिरवणूक पुढे गुरूद्वारा श्री गुरूनानक दरबार तुकूमकडे मार्गक्रमीत झाली.

यावेळी भाजपा चंद्रपूर महानगराध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहूल पावडे, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, रवि गुरनुले, भाजयुमो शहर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, सुरज पेदुलवार, चांद सय्यद, राकेश बोमनवार, चंदन पाल, संदीप आगलावे, सचिन कोतपल्‍लीवार, डॉ. दीपक भट्टाचार्य, चंद्रकला सोयाम, शितल कुळमेथे, प्रभा गुडधे, सुनिल डोंगरे, रेणु घोडेस्‍वार, मुग्‍धा गायकवाड, मनीषा महातव, सुर्या खजांची, धनराज कोवे, प्रमोद शास्‍त्रकार, रेखा चन्‍ने, मंगला काळे, रंजना उमाटे, यश बांगडे, रूद्रनारायण तिवारी, रामकुमार आकापेल्‍लीवार, भानेश मातंगी, बाळू कोलनकर, रितेश वर्मा, मनोज पोतराजे, आकाश ठुसे, महेश कोलावार, सुशांत आक्‍केवार, अमोल मत्‍ते, बंडू गौरकार, सुशांत शर्मा, शुभम सुलभेवार, प्रविण उरकुडे, गणेश गुंडावार, अमित निरंजने, कृष्‍णा चंदावार, आकाश मस्‍के, गणेश रायपायले, श्‍याम बोबडे, महेश दवे यांची उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here