यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन
भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित सण आहे, जो मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने साजरा केला जातो. रक्षाबंधनानंतर भाऊबीज हा भाऊ-बहिणीच्या खोल प्रेमासाठी समर्पित केलेला दुसरा उत्सव आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दरवर्षी आपण भाऊबीज कार्यक्रम आयोजित करतो. या कार्यक्रमाला आल्यावर माझ्या बहिणींची लक्षणीय उपस्थिती पाहुन वाढलेल्या जबाबदारीची जाण होते. यंग चांदा ब्रिगेडच्या या बहिणींच्या स्नेहातुनच सामाजिक क्षेत्रात नव्या जोमाने काम करण्याची उर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने जगन्नाथ बाबा मठ येथे भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कल्यानी जोरगेवार, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितिन मत्ते, जिल्हा संपर्क प्रमूख बंडू हजारे, नरेश काळे, संदीप दिवाण आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देता यावा यासाठी आपण यंग चांदा ब्रिगेडची स्थापना केली होती. केवळ समाजकारण हेच या संघटणा स्थापनेमागचा उद्देश होता. सामाजिक क्षेत्रात काम करत असतांना महिलांचा लक्षणीय सहभाग लाभला गेला. आज हि संघटना विस्तारित झाली आहे. यातही यंग चांदा ब्रिगेडच्या सक्रिय महिला सदस्यांचे मोठे योगदान आहे. या भगीनींमुळेच संघटना समाजातील दुर्लक्षीत घटकांपर्यंत पोहचुन त्यांना न्याय देऊ शकलो असल्याचे ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेड आता मोठा परिवार झाला असुन परिवार प्रमुख म्हणून माझ्या जबाबदा-याही वाढल्या आहे. या महिला भगिनी घरची जबाबदारी सांभाळून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. कामाच्या व्यस्ततेत त्यांचे त्यांच्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष होत असते. त्यामुळे आपण महिलांसासाठी भव्य आरोग्य शिबीर आयोजित करणार आहोत. या शिबिरामध्ये तपासणी, औषधोपचार आणि कोणता मोठा रोग आढळल्यास त्यावरती निशुक्ल उपचार केल्या जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आपण आयोजित केलेल्या माता महाकाली महोत्सवात महिलांचा सहभाग लाभला. त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी उत्तम रित्या पार पाडल्या. संघटनेच्या प्रत्येक उपक्रमात महिलांचे मोठे योगदान राहिले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रक्षाबंधन आणि भाऊबिज हे कार्यक्रम नित्यनियमाने घेतल्या जात आहे. भाऊ बहिण्याच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या आयोजनात कधिही खंड पडू देऊ नका असे आवाहणही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यंग चांदा ब्रिगेड ही सुख दु:खात सहभागी होणारी संघटना असुन तुमच्या कठीण काळी मला आठवण करा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी उभा राहिल असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे औक्षवण करत भाऊबीज साजरी केली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनीही उपहार स्वरूप बहिणींना भेटवस्तू दिल्या.
या कार्यक्रमात कथ्थक या नृत्य प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर पूरस्कार प्राप्त करणाऱ्या सपना पॉल आणि पड्याल या चित्रपटात अभिनय करणाऱ्या निखील कडुकर यांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनिषा पडगेलवार यांनी संगीतमय कार्यक्रम सादर केला. तर रिध्दी राऊत यांनी सुत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, बंगाली समाज शहर संघटीका सविता दंडारे, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, आशा देशमुख, दुर्गा वैरागडे, अस्मिता डोणारकर, अल्का मेश्राम, प्रेमीला बावणे, कविता निखारे, विमल कातकर, अनिता झाडे, वैशाली मद्दीवार, स्मिता वैद्य, माधुरी निवलकर, कल्पना शिंदे, रुपा परसराम, शमा काजी, वंदना हजारे, नंदा पंधरे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांची हजारोच्या संख्येने उपस्थिती होती.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793