ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आयोजीत “धरती आबा बिरसा मुंडा” नाटकाला हजारो प्रेक्षकांची गर्दी

0
91
चंद्रपूर : क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती व जनजाती गौरव दिनानिमित्य चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार वने, मत्स्यव्यवसाय, सांस्कृतिक कार्य मंत्री यांचे मार्गदर्शनात गांधी चौक लगत असलेल्या मनपाच्या मोकळ्या जागेत निर्माता, दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांचे क्रांतीसुर्य धरती आबा बिरसा मुंडा हे नाटक भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा महानगर चंद्रपूरच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. चुडाराम बल्लारपूरे लिखीत नाटकाला संगीत केईश्श्वर, लोकेश दुर्गे, विपिन राऊत यांनी दिले. नाटकाचे उद्घाटन क्रांतीविरांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पन व दिप प्रज्वलन भाजपा जिल्हा महानगरचे जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचे हस्ते करण्यात आले. तेव्हा प्रमुख उपस्थितीत भाजपाचे जेष्ठ नेते श्री. प्रमोदभाऊ कडु, जिल्हा संघटन महामंत्री श्री. राजेंद्र गांधी, जिल्हा महामंत्री श्री ब्रिजभूषण पाझारे, श्री. सुभाषभाऊ कासनगट्टूवार, श्री. रवि गुरनुले, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. अंजलीताई घोटेकर, माजी उपमहापौर मनपा चंद्रपूर राहुल पावडे,रवी आसवांनी,अरुण तिखे,अनु. जमाती मोर्चा महानगर चे अध्यक्ष श्री. धनराज कोवे, कु. रंजनाताई किन्नाके, श्री रुद्रनारायण तिवारी, श्री. धम्मप्रकाश भस्मे, सौ. किरण बुटले, माजी महिला व बालकल्याण सभापती सौ. चंद्रकलाताई सोयाम, माजी उपसभापती शितलताई कुळमेथे, माजी नगरसेविका सौ. मायाताई उईके, सौ. शितलताई आत्राम, सौ. ज्योतीताई गेडाम, सौ. शिलाताई चव्हाण, प्रदीप किरमे,मंडळ अध्यक्ष श्री. दिनकरजी सोमलकर, श्री. सचिन कोतपल्लीवार, श्री. रवि लोनकर, श्री. संदिप आगलावे, श्री. विट्ठल डुकरे, सोपान वायकर,राजेंद्र खांडेकर, गणेश गेडाम,सूर्यकांत कुचनवार,सूर्या खजांची,प्रज्वलनत कडू, सुरज पेद्दूलवार,रेणुका घोडेस्वार,गणेश रंगुंडावार,चांद पाशा,मनीषा महातव,महेश कोलावार,सत्यम गाणार,गिरीजी, खैरे,जानव्ही येले,
यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात उलगुलान पुकारनारे बिरसा मुंडा या राष्ट्रीय योद्धाच्या संघर्षमय जिवनावर आधारीत अवघ्या पंचेविस वर्षात प्राणाची आहुती देऊन मायभूमीला स्वातंत्र मिळविण्यासाठी जिवन वाहना-या बिरसाचे नाटक पाहण्यासाठी मनपाच्या मोकळ्या जागेवर हजारोच्या संख्येने भरगच्छ गर्दी जमली होती. बिरसाच्या व्यथेचे चित्रण हुबेहुब साकारणा-या कलावंतांचे अभिनय पाहुन बहुदा मंत्रमुग्ध प्रेक्षकांना रडतांना बघायला मिळाले. हा नाटकाच्या यशस्वितेचा भाग होता. ना. सुधिर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेला नाट्य प्रयोग प्रेक्षकांना प्रेरीत करणारे व बिरसा या थोर महान क्रांतीविराला विनम्र अभिवादन करणारे होते. सर्व जनतेला बिरसा माहिती व्हावा या उद्देशाने आयोजन करण्यात आलेले होते. मागील दोन वर्षापुर्वी देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भारतातील 12 करोड आदिवासीचा गौरव करीत बिरसा मुंडा जयंतीचा दिवस हा राष्ट्रीय जनजाती गौरव दिन म्हणून घोषीत केला. व यावर्षी संपूर्ण देशभर राष्ट्रीय बिरसा पर्व म्हणून घोषीत करुन बिरसा जयंती उत्सहात साजरी करण्याचे निर्देश दिले. तेव्हा चंद्रपूर येथे बिरसाच्या जिवनावर आधारीत नाटक आयोजित करुन चंद्रपूरातील आदिवासी जनतेला गौरन्वित केले. करीता समाजातील विविध संघटना व मान्यवरांनी ना. मुनगंटीवार यांचे स्वागत करीत आभार म्हाणले. दुपारी १२. व वाजतापासून सदर ठिकाणी अदिवासी समाजातील शेकडो क्रांतीविरांची सुबक माहिती व चित्र प्रदर्शनी लावण्यात आली होती. ती पाहण्यासाठी शहरातील विविध शाळेच्या विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन लाभ घेतला, तसेच देशभक्ती व गोंडी गितावर नृत्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाच्या आयोजनाचे प्रमुख श्री. ब्रिजमुषन पाझारे, सहप्रमुख श्री. धनराज कोवे हे होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अरविंद मडावी, श्री. किशोर आत्राम, श्री. यशवंत सिडाम, श्री. शुभम गेडाम, सी. गिताताई गेडाम, शितल कुळमेथे, श्री. विक्की मेश्राम, तृष्णा गेडाम, श्री. प्रलय सरकार, श्री. आकाश मस्के, श्री. प्रविण उराडे, अमित निरांजने, अखिलेश रोहीदास, श्री. बंडू गौरकार, श्री. नितीन करीया, जयश्री आत्राम, सौ. सिमाताई मडावी, श्री. सचिन आत्राम, सचिन मेश्राम, अमित गेडाम, डुमदेव सौ. राखी धनराज कोवे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. उदेश कैतवास व शुभम गेडाम यांनी केले तर आभार धनराज कोवे यांनी मानले.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here