===============================
चंद्रपूर*:- महाराष्ट्रात येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू होणार असून चंद्रपूर विधानसभेमध्ये फ्लेक्स बॅनरच्या माध्यमातून चंद्रपूर विधानसभा आपणच लढणार अशी फलक बाजी सुरु झाली आहे. कित्येक जण आपला दावा या माध्यमातून करत आहेत. सारेच निवडणूक लढविणार असे चित्र निर्माण केल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर शहरात चौका चौकामध्ये बॅनर वार सुरु झाल्याचे दिसून येत आहे. बॅनरच्या माध्यमातून आप आपल्या उमेदवारीवर सर्वच पक्षातील लोकांनी दावेदारी सुरू केली आहे. त्यामुळे चंद्रपूर विधानसभेचे वातावरण पूर्णपणे टाइट झाल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.
चंद्रपूर मध्ये यंदा विद्यमान आमदाराला जनतेचा कोल मिळते की काय ? असे चित्र दिसून येत असल्याचे यावेळी सुद्धा बोलल्या जात आहे.
मात्र चंद्रपूर मध्ये दोन मोठ्या पक्षांमध्ये उमेदवार नसल्याने जनता मात्र विद्यमान आमदारालाच आपला यंदाचा आमदार ठरवू शकते अशी सुद्धा चर्चा सर्वत्र होताना दिसून आहे.
मात्र दोन मोठ्या पक्षांमध्ये सध्या तरी उमेदवार नसल्याने विद्यमान आमदाराला कोणता उमेदवार फाईट देऊ शकेल असा उमेदवार सध्या तरी या दोन पक्षांमध्ये नसल्याचे सुद्धा सांगण्यात येत आहे.त्यामुळे येणाऱ्या चंद्रपूर विधानसभेचे वातावरण टाइट विद्यमान आमदाराला कोन देणार फाईट? अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
*भाजप आपला दावा सोडणार का?*
भाजप ने या क्षेत्रातून अनेकदा विजय मिळवला आहे. नानाभाऊ शामकुळे नी दोन वेळा. हा गड सर केला. त्यापुर्वी हा गड सुधिर मुनगंटीवार यांनी कायम राखला होता. असा गड भाजप सोडणार का? असा सवाल विचारला जात आहे. भाजप चे निष्ठावान ब्रीजभूषण पाझारे हे अनेक वर्षापासुन तयारी करत आहेत. त्यांना यावेळी तिकीट मिळणे हा त्यांचा हक्क आहे. मात्र यावेळी वातावरण वेगळे दिसत आहे. विद्यमान आमदार जोरगेवार हे भाजपवासी होतील का? नानाभाऊ पुन्हा येतील का? अशीही चर्चा आहे. म्हणूनच अजून भाजप ने आपले पत्ते उघडलेले दिसत नाही.
*काँग्रेस मध्ये भाऊ गर्दी*
वातावरण पोषक आहे म्हणून सद्या काँग्रेस मध्ये हवसे नवसे शिरलेले दिसत आहेत. यात एकही सक्षम उमेदवार नाही. जातीच्या आधारावर निवडणुक जिंकता येते असा भ्रम पसरला आहे. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,






















