*राष्ट्रीय पत्रकारीता दिन चंद्रपुरात अति उत्साहाने साजरा*

0
45

चंद्रपूर(का.प्र.):-
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता. 16 नोव्हेंबर हा प्रेस कौन्सील ऑफ इंडियाचा स्थापना दिवस आहे. हा दिवस “राष्ट्रीय पत्रकारीता दिन” म्हणून साजरा करण्यात येताे. आपल्या धारदार लेखणीच्या माध्यमातून समाजात जनजागृतीचे निस्वार्थ कार्य करत असलेल्या सर्व पत्रकार बंधू- भगिनींना राष्ट्रीय पत्रकारीता दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्याकरिता तसेच आत्मचिंतन करिता चंद्रपुर येथे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद तर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी राष्ट्रीय पत्रकारीता दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी घेण्यात आलेल्या कार्यशाळा आणि प्रबोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक प्रा.डॉ.इसादास भडके सर होते. कार्यक्रमाचे उदघाटन रिपब्लिकन नेते देशक खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार यशवंतजी दाचेवार सर हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कलम मागे इंसाफ चे संपादक व विदर्भ संपादक,पत्रकार बहुउद्देशीय संस्थांचे संस्थापक /अध्यक्ष सय्यद रमजान अली तसेच पत्रकार शेख अनवर सह दैनिक कळंब नगरीचे उप संपादक तथा राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाचे विदर्भ संघटक निलेश ठाकरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मराठी वृत्त पत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर आणि पत्रकारीतेचा स्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार डा. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला माल्यारपण करून व दिप प्रज्वलीत करून
करण्यात आली. सदर कार्यक्रमात वक्त्यांनी काल आणि आजची पत्रकारिता आणि पत्रकारांची वर्तमान परिस्थिती यावर आपले विचार व्यक्त केले. निलेश ठाकरे यांनी आपले मनाेगत व्यक्त करतांना अनेक पत्रकारांना आज पत्रकारीता दिन असुन ही आजच्या दिनाचा विसर पडला दिसुन येताे अशी खंत व्यक्त केली.सय्यद रमजान अली यांनी केवळ नाम मात्र पत्रकारीता करणाऱ्या पत्रकारांमुळे चांगली पत्रकारीता कुठे तरी हरपुन गेल्याचे सांगीतले.व पत्रकारांनी पत्रकारिता ची गरिमा कायम ठेवावी व आप आपसात एकमेकांचे द्वेष करू नये अशी स्पष्ट प्रतिक्रिया देत मोलाचे मार्गदर्शन केले.पत्रकार शेख अनवर यांनी आठवन ठेवुन आवर्जुन हा कार्यक्रम आयाेजकांनी आयाेजित केला म्हणून त्यांची प्रशंसा केली.
ज्येष्ठ पत्रकार यशवंतजी दाचेवार सर यांनी आजची पत्रकारीता कालांतराने पुर्णपणे बदलुन गेली व अनेक वर्षाचा पत्रकारीतेच्या क्षेत्रातला आपला अनुभव सांगत उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उदघाटक रिपब्लिकन नेते देशक खोब्रागडे यांनी पत्रकारांना माैलाचा संदेश देला.
साहित्यिक प्रा.डॉ.
इसादास भडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पत्रकारीता ही लाेकशाहीचा आधार असल्याने पत्रकारांनी पुन्हा लाेकशाहीला आपल्या लेेखनीच्या माध्यमातुन धारदार करावे म्हनुन पत्रकारांना मुलमंत्र दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक गोपी मित्रा यांनी तथा संचालन धनंजय तावाडे यांनी उत्कृष्ठ संचालन केले तर आभार प्रदर्शन डॉ.सत्यजित पोद्दार यांनी केले. यावेळेस अनेक मान्यवर तसेच पत्रकारांचा शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार साेमु येलचलवार, आनंद पॉल, नवाब खॉन पठान, बंडु कामतवार, सचिन बाबडे,हितेंद्र मोडक सईद भाई,तेजराज भगत सह बहुसंख्येने पत्रकार बांधव हजर हाेते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता गाेपी मित्रा शशीकांत ठक्कर यांनी अथक परीश्रम घेतले.
सय्यद रमज़ान अली

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here