भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस उत्‍साहात साजरा. नागरिकांनी घेतला आरोग्‍य शिबीराचा लाभ

0
31

राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या विकासामध्‍ये भरीव योगदान देणारे भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांचा वाढदिवस जिल्‍हाभर मोठया उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. चंद्रपूर जिल्‍हा परिषद अध्‍यक्ष म्‍हणून त्‍यांनी भरीव कामगिरी केली आहे. तसेच पक्षाचे विचार चंद्रपूर जिल्‍हयातील गावगाडयापर्यंत पोहचविण्‍याकरिता अहोरात्र कष्‍ट घेत आहेत. त्‍यांच्‍या एकुणच कर्तृत्‍वाचा गौरव करण्‍याकरिता स्‍थानिय लालपेठ येथे त्‍यांच्‍या वाढदिवसाचे निमीत्‍त साधुन आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले.

दिनांक २१ नोव्‍हेंबर २०२२ रोजी लालपेठ येथे देवराव भोंगळे यांच्‍या वाढदिवसानिमीत्‍त भारतीय जनता पार्टी व मित्र परिवारातर्फे आरोग्‍य शिबीराचे आयोजन करण्‍यात आले. यावेळी भाजपाचे माजी उपमहापौर राहूल पावडे यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. राहूल पावडे यांच्‍या हस्‍ते भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांच्‍या वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्‍यात आला.

यावेळी १८८ नागरिकांची आरोग्‍य तपासणी करण्‍यात आली. ७१ नागरिकांचे उच्‍च रक्‍तदाब तपासणी करण्‍यात आली, ५५ नागरिकांची मधुमेह चाचणी करण्‍यात आली, ०७ नागरिकांना कोविड व्‍हॅक्‍सीनेशन देण्‍यात आले, ५८ नागरिकांची रक्‍त तपासणी करण्‍यात आली. यावेळी भारत सरकार द्वारे कार्यरत असलेल्‍या आयुष्‍यमान भारत योजनेचे आभा कार्ड वितरीत करण्‍यात आले. या आरोग्‍य शिबीराकरिता डॉ. शुभांकर पिदुरकर, डॉ. अतुल चटकी, परिचारीका संगीता जगताप, करूणा गोंगले, पिंकी पेंढारकर, अर्चना आवारी, आशा वर्कर किरण करमरकर, मिनाक्षी ढोमणे, सोनाली गेडाम, राजेश्‍वरी दुर्गे, वैशाली पतने, वर्षा धोबे यांनी आपले योगदान दिले.

याकार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेकरिता भाजपा व भानेश मातंगी मित्रपरिवारातील श्री‍पाद पिंपळापूरे, सारय्या पोटला, लीलाधर टेकाडे, संजू कडम, जूपाल्‍ला रायलिंगू, संपत कडम, रमेश पलिपाका, प्रकाश सुर्यवंशी, जयसिंग महेश मेश्राम, व्‍यंकटेश जनगम, लाला सुर्यवंशी, पंकज श्रीवास, आकाश मातंगी, आकाश बुडदी, प्रभाकर इरला, नरसिंग मातंगी, मल्‍लेश मातंगी इत्‍यादींनी अथक परिश्रम घेतले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here