चंद्रपूर : राष्ट्रहित हाच खरा धर्म आहे. राष्ट्रहितापुढे सर्वकाही गौण आहे, व सर्वांआधी राष्ट्रहित श्रेष्ठ आहे, त्यामुळे देशातील प्रत्येक व्यक्तीने राष्ट्रहित जोपासले पाहिजे व देशहीताला प्राधान्यक्रम देऊन वाटचाल केली पाहिजे. सोबतच प्रत्येक नागरिकांनी कुटुंबाचे महत्त्व जाणून कौटुंबिक मूल्यांना प्राधान्य दिले पाहिजे. खरे देव हे आपले आई-वडील असून त्यांची सेवा करणे हीच खरी पूजा आहे, असे ओघवते विचार ह.भ.प. सोपान दादा कनेरकर यांनी व्याख्यानाप्रसंगी मांडले.भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या जन्मदिनानिमित्त माजी उपमहापौर राहुल पावडे मित्रपरिवारातर्फे भव्य जाहीर व्याख्यानाचे आयोजन (दि. 21) ला स्थानिक रघुनंदन लॉन मधे करण्यात आले होते.यावेळी महाराष्ट्रातील लाखो युवकांचे प्रेरणास्थान, युवा व कार्पोरेट ट्रेनर, युवा व्याख्याते, प्रखर विचारवंत, युवा कीर्तनकार, समाज प्रबोधनकार, युवा पिढीला दिशा देणारे ह.भ.प. सोपान दादा कनेरकर यांचे ओजस्वी व्याख्यान पार पडले.यावेळी जिल्ह्यातील भाजपाचे लोकप्रिय नेतृत्व तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव दादा भोंगळे, ह.भ.प. सोपान दादा कनेरकर, योग नृत्याचे संचालक गोपाल मुंधडा, सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय ढवस, भारत स्वाभिमान जिल्हा संघटक विजय चंदावार जी, सुप्रसिद्ध डॉ. सुधीर मत्ते, डॉ. सौरभ राजूरकर, जयंत भाऊ मामिडवार, माजी नगरसेविका शीलाताई चव्हाण, सविता कांबळे, चंद्रकला सोयाम, मायाताई उईके, प्रशांत चौधरी, सोपान वायकर, रवि गुरूनुले, आदी उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या स्वागतानंतर देवराव दादा भोंगळे यांच्या जन्मदिनानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या. त्यानंतर सोपान दादा कनेरकर यांचे मंत्रमुग्ध करणारे व्याख्यान पार पडले. कार्यक्रमाच्या शेवटी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तथा कार्यकर्त्यांनी देवराव भोंगळे यांना शुभेच्छा प्रदान केल्या.माजी उपमहापौर राहुल पावडे यांच्या नेतृत्वात मित्र परिवारातील संजय बुरघाटे, संजय निखारे, सुरेश हरिरामानी, विठ्ठल डुकरे, अरुण तिखे,रवी जोगी, महेश राऊत, चांद सय्यद, अभय बनपुरकर, संदिप देशपांडे, किरण बुटले, आशिष ताजने, प्रिया नांदे, मोनिषा महातव, रेनुताई घोडेस्वार, मुग्धा खाडे, सुनील डोंगरे, प्रमोद क्षीरसागर, प्रज्वलंत कडू, सूरज पेदूरवर, प्रमोद शास्त्रकर, संदिप आगलावे, चंदन पाल, सचिन कोतपल्लिवार, रवि लोणकर, राजेश सज्जनवार,डांगे काका, राजूरकर सर शेंडे काका,रणजित डवरे , रुद्रनारायन तिवारी, धनराज कोवे, धम्प्रकाश भस्मे, अमित गुंडावार, सचिन बोबडे, अमित गौरकर, कविता ताई, अक्षय शेंडे, श्याम बोबडे, प्रणय डंभारे, पंकज भडके, पियूष लाकडे, अभी वांढरे, मनोज पोतराजे, कृष्णा चंदावार, शैलेश पिपरे, राहुल जांभूळकर, संदिप सद्भैभये, पवन ढवळे, अमोल नगराळे प्रतीक गणफडे, आकाश चोरे,आकाश चौधरी, महेश दर्वे, अमोल मत्ते, शुभम गेडाम, गणेश रासपायले, सुशांत आकेवार, मंगेश भटारकर, रोहित भट, सचिन लग्गड प्रितेश मेंढी, रीतेश वर्मा, यश ठाकरे शुभम गेडाम, सुनीता मुरस्कर, माया हजारे, संगीता शिरसागर, सुवर्णा इंगोले, सूनदा गाऊत्रे, पुष्पा भट, देवतळे ताई, पाटील ताई, मोरे ताई अर्चना बटे, दिंडोकर काकू, चौधरी ताई, ढेंगडे ताई,आदींची कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793