हनुमान मूर्तीची विटंबना करणा-र्या समाजकंटकांना तात्काळ अटक करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना निवेदन

0
32

चंद्रपूर बल्लारपूर महामार्गावरील भिवकुंट नाल्याजवळ असलेल्या श्री. हनुमान मंदिरातील हनुमान मुर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असुन सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांना देण्यात आले आहे.
विसापूस गावाजवळ असलेल्या श्री. हनुमान मंदिरातील हनुमान मूर्तीची विटंबना केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर भक्तांनी येथे मोठी गर्दी केली होती. यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनीही सदर ठिकाणची पहाणी केली. त्यानंतर यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रससिंग परदेशी यांची भेट घेत मुर्तीची विटंबना करणा-र्या समाजकंटकांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हा अध्यक्ष पंकज गुप्ता, शहर युथ अध्यक्ष कलाकार मल्लारप, राशेद हुसेन, प्रतिक शिवणकर, सलीम शेख, राम जंगम, अमन खान, दिनेश इंगळे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here