आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतला विविध विभागाच्या कामांचा आढावा

0
63

जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात संपन्न झाली बैठक

आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात विविध विभागाच्या अधिका-र्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विभागाअंतर्गत सुरु असलेल्या मतदार संघातील कामांचा आढावा घेतला. यावेळी महत्वाच्या सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांना केल्या आहे.

या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्र परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, , जिल्हा नियोजन अधिकारी गजानन व्याहाड, आरटीओ किरण मोरे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे, जिल्हा नगर विकास अधिकारी अजित डोके, तहसीलदार निलेश गौड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल मेंढे, घुग्घुसचे मुख्यधिकारी जितेंद्र गादेवार, वाहतुक विभागाचे पोलिस निरिक्षक पी.डी.पाटील, आदी अधिका-र्यांची उपस्थिती होती.

चंद्रपूरातील जटपूरा गेट येथील वाहतुक कोंडी सोडविण्याच्या दिशेने अपेक्षीत अशा उपायोजना करण्यात आलेल्या नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सदर वाहतुक कोंडी सोडविण्याच्या दिशेने प्रयत्न करा, येथे वाहतुक कोंडी झाल्यास ट्रॅफिक वळविण्यासाठी दिशा दर्शक फलक लावा, फहीम रेस्ट हाउस कडे जाणारा मार्ग तयार करा अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वाहतुक विभाग तथा मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना केल्या आहेत. यासाठी एक समिती तयार करण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी यांनी सदर बैठकीत अधिका-र्यांना दिले आहे. चंद्रपूरात वाहतुक कोंडीची मोठी समस्या जाणवत आहे. पार्किंग व्यवस्था नसल्याने नागरिक रस्त्याकडेला वाहणे पार्क करत असल्याने वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या मुख्य मार्गाने उपलब्ध असलेले मोकळे भुखंड पार्किकसाठी राखीव करा, २०० मिटरवर पार्किंग व्यवस्था उपलब्ध करा, आजाद बागेतील पार्किंग नागरिकांसाठी खुली करा, मुख्य रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर प्रतिबंधित घाला आदी सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महानगरपालिकेला केल्या आहे.

वेकोलि तर्फे पुनर्वसित सिध्दार्थ नगर येथील नागरिकांना वाटप केलेल्या जागेचे स्थायी पट्टे त्यांच्या नावाने करण्यात यावे, तुकुम येथील स्मशानभुमीसाठी वेकोलिच्या जागेचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे, जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र स्थापण करण्यासाठी चंद्रपूर येथील देगो तुकुम परिसरातील होमगार्ड प्रशिक्षण केंद्रा जवळील जागा मंजुर करण्यात यावी, घुग्घुस येथील नागरिकांना जागेचे कायस्वरुपी पट्टे देण्याची प्रक्रिया गतीशील करण्यात यावी, येथे स्टेडीयमसाठी 10 हेक्टर जागा आरक्षीत करण्यात यावी, प्रलंबीत असलेला घुग्घूस बायपासचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा, येथे नागरी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात आदी सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर बैठकीत केल्या आहे.

आमदार निधीतून चंद्रपूर येथे 100 फुट तर घुग्घुस येथे 75 फुटांचा उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वज परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, दाताळा स्मशानभुमीच्या कामाला मंजुरी देण्यात यावी, आदि सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित विभागाला केल्या आहे. यावेळी जिल्हा वार्षिक निधी अंतर्गत चंद्रपूर मतदार संघात सुरु असलेल्या विकास कामांचाही आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा घेतला असुन नागरिकांचे प्रश्न मार्गी काढण्याच्या दिशेने प्रशासनाने काम करण्याच्या सुचना केल्या आहे. या बैठकीला माजी नगर सेवक बलराम डोडाणी, यंग चांदा ब्रिगेडचे अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे,  यंग चांदा ब्रिगेडचे शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे, विलास वनकर, विश्वजित शाहा, लक्ष्मन टोकला आदिंची उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here