चंद्रपूर मनपा च्या वतीने सुरु असलेल्या स्वच्छता लीग स्पर्धेत

0
48

आझाद गार्डन योग नृत्य परिवार ने निवडलेल्या गोविंद स्वामी मंदिर परिसरात केलेल्या सौन्दर्यकरणास चंद्रपूर चे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी भेट दिली. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात मंचावर किशोरभाऊ जोरगेवार योग नृत्य परिवार चे संस्थापक मा.गोपालजी मुंदडा, बलराम दोडानी, पंकज गुप्ता, मंदिराचे ट्रस्टी किरण अंदणकर, प्रकाश कवीश्वर, सुबोध दुर्गोपुरोहित उपस्थित होते. सुरवातीला सौदंर्य करण प्रकल्पची माहिती मंगेश खोब्रागडे आणि मुग्धा खांडे यांनी दिली. यानंतर गोपालजी मुंदडा यांनी तेथे असलेल्या अडचणी व समस्या सांगून त्या सोडविण्याची विनंती केली. किशोरभाऊ जोरगेवार यांनी योग नृत्य परिवार करीत असलेल्या कार्याचे भरभरून कौतुक करून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आणि सांगिलेल्या समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावाडे यांनी तर आभार प्रदर्शन अल्का गुप्ता यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राधिका जी मुंदडा, पुनम पिसे,मयुरी हेडाऊ, मीना निखारे, रुबी शेख, सूरज घोडमारे,रंजना मोडक, बाळकृष्ण माणूसमारे, रवी निखारे, विशाल गुप्ता, सुरेश घोडके, विनोद कामनवार व इतर मंडळींनी अथक परिश्रम घेतले.

“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here