येथील साने गुरुजी सोसायटीमधील श्री दत्तवाडी येथील श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिरात दि.३० नोव्हेंबरपासून श्री दत्त जयंती नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.३० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते ४ ओंकार भजन मंडळातर्फे भजन संध्या, ४ ते ६ पर्यंत घोरकष्टोध्दरणं स्तोत्राचे पठण, दि.१ डिसेंबर रोजी पवनसुत भजन मंडळाची भजन संध्या, ह.भ.प. सविताताई खरवडे ब्रम्हपुरी यांचे प्रवचन, दि.२ डिसेंबर रोजी ह.भ.प. मनोजबुवा वठे यांचे भारुड निरुपण, ३ डिसेंबर रोजी रागिणी वेलंकीवार चंद्रपूर यांचे भगवद्गीता पठण व हे.भ.प. प्रतिभाताई पुल्लीवार यवतमाळ यांचे कीर्तन, ४ डिसेंबर रोजी शिवशक्ती भजन मंडळाची भजन संध्या, दीप महोत्सव व संगीत, दि. ५ डिसेंबर रोजी भक्ती संगीत व भजन आणि महिलांचे विविध कार्यक्रम, दि. ६ डिसेंबर रोजी महिलांचे व बालकांचे विविध कार्यक्रम, दि.७ डिसेंबर रोजी श्रींचा रुद्राभिषेक, दत्त जन्म सोहळा, ८१ जोडप्यांच्या हस्ते महाआरती, ह.भ.प.संगिताताई देशपांडे नागपूर यांचे दत्तजन्माचे कीर्तन, सायंकाळी ५.३० वाजता भव्य शोभायात्रा, दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता संगिताताई देशपांडे यांचे काल्याचे कीर्तन व सायंकाळी ५ ते ११ पर्यंत महाप्रसाद वितरण आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. तसेच दि.३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर पर्यंत रोज सकाळी १० ते दुपारी १२.३० पर्यंत श्री गुरुचरित्र सप्ताह पारायण राहणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793