राज्यातील जनतेच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची महाराष्ट्र शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करू. -आम आदमी पार्टी बल्लारपूर

0
43

सोमवार दिनांक:- 05 डिसेंबर 2022 रोजी आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. यामध्ये पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

१) संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई प्रती हेक्टरी ५० हजार देण्यात यावी. पिक विमा कंपनीला सरसकट पिक विमा देणे अनिवार्य करावे.
२) शेतमजुरांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम देण्यात यावे.
३) शेतीला दिवसा १२ तास वीज पुरवठा करावा, थकीत वीज बिल व शेती कर्ज माफ करावे.
४) सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी तातडीने निर्णय घावेत, अंश कालीन कर्मचाऱ्यांना तातडीने कायम करण्यात यावे.
५) सरकारी शाळा दिल्लीच्या धर्तीवर दर्जेदार कराव्यात, कमी पट संख्या असलेली एकही शाळा बंद होणार नाही याची हमी द्यावी.
६) खाजगी शाळा प्रशासनाकडून पालकांची होणारी आर्थिक लुट थांबविण्यासाठी शुल्कावर नियंत्रण आणावे व शिक्षण अधिकार कायद्याची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्यात यावी.
७) पंतप्रधान आवास योजनेतील रखडलेला निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा.
८) अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आदिवासी व बिगर आदिवासिंना वन जमिनीचे पट्टे देण्याचा प्रश्न निकाली काढून वाहितदारांना पट्टे देण्यात यावे.
९) वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी अस्तित्वाव असलेल्या कायद्यात बदल करावा.
पक्षाचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी निवेदन दिल्यानंतर इशारा दिला की जर वरील मागण्या अधिवेशनापूर्वी मान्य झाल्या नाहीत तर येत्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे आम आदमी पार्टी या मागण्यांना घेऊन राज्यव्यापी जन मोर्चा काढणार .यावेळी शहर उपाध्यक्ष- अफजल अली, सचिव- ज्योतिताई बाबरे, कोषाध्यक्ष- आसिफ शेख, महिला संयोजिका- अलकाताई वेले , सह संयोजिका- सलमा सिद्दीकी, बस्ती विभाग चुनाव प्रभारी- प्रा.प्रशांत वालके ,CYSS उपाध्यक्ष- आशिष गेडाम, सुधाकर गेडाम, आशिष फुलझेले,बेबीताई बुरडकर, प्रणय नगराळे, समशेर सिंह, अवधेश तिवारी, स्मिताताई लोहकरे, पप्पू सेठ, श्रीकांत टेंमबुरडे व इत्यादी उपस्थित होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here