उद्या सोमवारी यंग चांदा ब्रिगेडची अधिकार बाईक रॅली धडकणार नागपूर विधान भवनावर

0
119

====÷÷÷÷÷÷÷÷÷÷

चंद्रपूर जिह्यातील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत द्या या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडची अधिकार बाईक रॅली नागपूर विधान भवनावर धडकणार असुन या बाईक रॅलीत हजारो दुचाकींचा समावेश असणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी या बाबतच्या तयारीची पाहणी केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्या हा विज उत्पादक जिल्हा आहे. कोळश्यावर आधारीत विज प्रकल्प येथे चालत असल्याने चंद्रपूरकरांना प्रदुषनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्याच्या मोबदल्या स्वरुप चंद्रपूरकरांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतीसाठी विज मोफत देण्यात यावी, उद्योग वाढीसाठी उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
याच मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात आयोजित अधिकार बाईक रॅलीची जय्यत तयारी सुरु असुन उद्या सकाळी सात वाजता गांधी चौकातुन रॅलीला सुरवात होणार आहे. या बाईक रॅलीमध्ये चंद्रपूरसह जिल्हाभरातुन नागरिक गांधी चौक येथे पोहचणार असुन याची जय्यत तयारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर ते नागपूर या रॅलीच्या मार्गाची व येथील तयारीची पाहणी केली आहे. या रॅलीला अभुतपुर्व प्रतिसाद मिळत असुन भव्य बाईक रॅली निघणार असल्याचा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.

================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here