* चंद्रपुर मनपाचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष ! *

0
38

=================

✍️ निलेश ठाकरे//कार्यकारी संपादक

चंद्रपुर,११ जानेवारी २०२३:

सद्या चंद्रपुर महानगरात आगमन हाेताच सर्वप्रथम एक विशेष दृष्य दृष्टीस पडतेय ते म्हणजे ‘आय लव्ह चंद्रपूर’ त्यातच हे वाक्य डिजिटल लाईट इफेक्ट्स सह आकर्षित फाँन्डस मध्ये लिहिलेलं दिसेल. मुख्य चाैकाच्या ठिकाणी सौंदर्यीकरण करून मनपाच्या लाेगाे सहित म्हणजे ते महानगरपालिका यांचे मार्फत केल्या गेलंय हेच सिध्द करायच आहे असेच दिसुन येईल.

त्यानंतर शासकिय रूग्णालय ईमारतीच्या वॉल कंपाऊंडवर असेल किंवा ज्युबली हॉयस्कुल, आझाद गार्डन वा ईतर ठिकाणच्या वॉल कंपाऊंडवर चंद्रपुर शहर कसे स्वच्छ ठेवता येईल, चंद्रपुरातला ऐतिहासिक वारसा जपनारे चित्र काढलेले दिसतात. मात्र हे सगळे चित्र चंद्रपुरातील मुख्य रस्त्यांवरच आपनास दिसुन येणार हे वास्तव आहे. पण जरं आपण महानगराच्या आतील भागात फेरफटका मारल्यास चंद्रपूर शहर हे अस्वच्छतामय असल्याचे सर्वत्र आढळुन येईल. अनेक वर्षांपासुन स्वच्छतेचा गाजावाजा करून मिरवणाऱ्या चंद्रपुर महानगरपालिकेने स्वच्छतेकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे हे तेवढेच सत्य आहे.

चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने घर घर कचरा संकलनाची याेजना राबवीत असतांना चंद्रपुर महानगराला स्वच्छ करण्यास मनपा कुठेतरी कमी पडतांना दिसते. त्यामुळे महानगरातल्या प्रत्येक प्रभागात अस्वच्छताच दिसुन येत आहे.

चंद्रपुर महापालिका ही निव्वळ बैनर, पाेस्टर व मोठ मोठ्या जाहिराती करून नुसता फुकट दिखावा करण्यातच सज्ज असते. जनतेच्या पैशाची उधळपट्टी कशी करावी हे चंद्रपुर महानगर पालिकेला सांगण्याची गरज नाही. यापुर्वीही जनतेच्या अश्या बऱ्याचश्या प्रकरणात पैश्यांची उधळण करण्यात आली हाेती. गटर लाईन करिता शहरात एकेकाळी माेठ्या प्रमाणात खाेदकाम करण्यात आले हाेते. त्यानंतर अमृत याेजने करिताही चंद्रपुर येथील झालेल्या सिमेंट रस्त्यांची वाट लावण्यात आली होती हे विशेष. अश्या अनेक याेजनांवर जनतेकडून वसूल केलेल्या टॅक्सचा पैसा पाण्यासारखा लावण्यात आला हाेता हे चंद्रपुरकर कदापिही विसरू शकणार नाहीत. अनेक मुद्यांकडे लक्ष न देता बाहेरून येणाऱ्या प्रवास्यांना लुभावण्या करिता हे सगळं गोडबंगाल केल्या जात असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये हाेतांना दिसते.

चंद्रपुर शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाल्यांची नियमितपणे स्वच्छताच हाेत नाही. रस्त्याच्या बाजुला असलेला घनकचरा कधी साफ हाेतांना दिसत नाही. शहरात महिलांकरिता सुलभ शौचालयाची ठिक ठिकाणी नितांत गरज असतांनाही शौचालय महानगरात शोधूनही सापडत नाही अन् जे असतील त्या सुलभ शाैचालयात दुर्गंधी व स्वच्छतेचा अभाव असल्याचेच दिसुन येईल. अश्या सुलभ शाैचालयात खरोखर नागरिकांना जाण्याची इच्छा होणार काय? शासकिय रूग्णालयाच्या स्वच्छते विषयी न बाेललेलेच बरे. तेथील अस्वच्छतेबद्दल अनेक तक्रारी करूनही व अनेक वृत्तपत्रात बातम्या प्रसारीत करूनही शासकिय रूग्णालयाची स्वच्छता जशी च्या तशीच दिसुन येते. चंद्रपुर महानगरातील स्वच्छतेच्या मुलभुत गरजा पुर्ण करायची समस्त जवाबदारी चंद्रपुर मनपाची असतांना मनपा जाहीरातीच्या माध्यमातुन आपलीच पाठ थाेपविण्यात मस्त माैला दिसुन येते हेही तेवढेच खरे.

~~~~~~~~~~~~~~~~~~

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*===

~~~~~~~~~~||||~~~~~~~~~

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here