* अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची चंद्रपूर स्तरावर स्थानिक बैठक संपन्न *

0
29

————————————-
चंद्रपूर ग्रामीण शहर तालुका स्तरावर पत्रकार संघाच्या बांधणीला सुरुवात
सदस्यता मोहीम सुरू!
————————————-
बैठकीला प्रदेश संपर्कप्रमुखांची उपस्थिती
————————————-
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची चंद्रपूर शहर स्तरावर मकर संक्रांत च्या पर्वावर दिनांक १५जानेवारी रविवार २०२३ला स्थानिक बल्लारशा जुनोना बायपास रोड वरील pd इंटरप्राईजेस संपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती .सदर बैठकीला महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात सदस्यता मोहीम सुरू करण्यात आली. प्रसंगी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या व सामाजिक मंचाच्या तालुका शहर ग्रामीण प्रत्येक स्तरावर संघटन व मजबुतीकरण करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी प्राधान्याने स्थान देत अग्रक्रमाने पुढाकार घ्यावा ही भूमिका प्रदेश संपर्कप्रमुखांनी विशद केली . पत्रकार संघाच्या वतीने पंधरवाडा सदस्यता मोहीम राबविण्यात येत असून विविध पातळीवर कृतिशील पदभार पदनियुक्त्या करण्यात येत असून सामाजिक न्याय मंच कृती समित्या व कार्यकारणी गठीत करण्यात येत आहे .बैठकीत चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे, गडचिरोली संपर्कप्रमुख गोपी मित्रा, दशरथ जी वाघमारे ,पल्लवी वासनिक, संजय रामटेके ,शशी ठक्कर वसंत येलचलवार ,विजय गेडाम, नितीन गाडगे आदींची उपस्थिती होती.

___________________________

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*_

_________________________________

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here