* श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार सीटीपीएस कामगारांच्‍या समस्‍यांची सोडवणुक *

0
36

__________________

 * सीटीपीएस रेल्‍वे कामगारांच्‍या सर्व मागण्‍यांची पुर्तत *

राज्‍याचे वने सांस्‍कृतिक व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सीटीपीएस रेल्‍वे सायडिंग चंद्रपूर सिव्‍हील जंक्‍शन कंपनी कामगारांच्‍या विविध समस्‍यांची रेल्‍वे अधिका-यांसोबत बैठक घेऊन सोळवणुक करण्‍यात आली. त्‍यामुळे कर्मचा-यांनी समाधान व्‍यक्‍त केले आहे.

दि. १८ जाने. २०२३ रोजी श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली भाजपा कामगार मोर्चा महाराष्‍ट्र प्रदेश महासचिव अजय दुबे यांनी सिटीपीएस रेल्‍वे सायडिंग चंद्रपूर सिव्‍हील जंक्‍शन कामगारांच्‍या विविध समस्‍यांबाबत रेल्‍वे अधिका-यांसोबत बैठक घेऊन कामगारांना किमान वेतन, पीएफ बाबतची समस्‍या, कामगारांना नियमितपणे कामे मिळणे यासारख्‍या अनेक समस्‍यांबाबत संयुक्‍त बैठक घेण्‍यात आली. या बैठकीमध्‍ये कामगारांच्‍या सर्व मागण्‍या मान्‍य करण्‍यात आल्‍या. यावेळी प्रामुख्‍याने कुर्बान शेख, करतारसिंह डिंगे, शुभम जंगमवार, आनंद नायडू, महेश लोगासे, शुभाष मडावी, शुभम तिवारी, मनदीपसिंह भुल्‍लर, प्रशांत मोरे आदिंची उपस्थिती होती. सर्व कामगारांनी श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.

~~~~~~~~~~~~~~~~~~

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

~~~~~~~~~~~~~~~~~~~

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here