* पर्यावरणाचा संदेश देत स्त्रियांनी केला स्त्री शक्तीचा जागर *

0
29

—————————————-

* भारत देशात उष्णतेच्या बाबतीत प्रथम क्रमांक असणारा चंद्रपूर जिल्हा मधून अभिनव प्रयोग *
—————————————-
जागर स्त्री शक्तीचा महिलांचा स्नेह मिलन संवाद सोहळात अपंगत्वावर मात करीत निर्भयपणे लढणाऱ्या उद्योगशील महिला रत्ना सरकार व दोन चाके व दोनशे तालुके सबंध महाराष्ट्र सायकलने भ्रमण करून आलेली पर्यावरण प्रेमी प्रणाली चिकटे चा सत्कार
—————————————
200 महिलांना वृक्ष भेट देत संक्रांतीचे फेडले वाण
—————————————-
चंद्रपूर- पर्व नवीन वर्षाचे, मकर संक्रातीचे, स्त्रीशक्तीच्या जागरतेचे उन्नतीचे हा सामाजिक दृष्टिकोन बाळगून ,मकर संक्रांतीच्या निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा महिलांचा स्नेहमिलन संवाद सोहळा मिळून साऱ्याजणी हा अभिनव उपक्रम सावित्री स्वयंसहायता समूह संस्थापक अध्यक्ष संयोजक पल्लवीताई वाघमारे सामाजिक मंच महिला विभाग संलग्नित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूर शहर विभाग च्या माध्यमाने २२जानेवारी २०२३ला रयतवारी महाकाली काँलरी माईन्स क्वाटर प्रांगण परिसरात आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक तर उद्घाटक म्हणून सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक लेखिका पुष्पाताई आत्राम ,प्रमुख अतिथी मार्गदर्शिका (पर्यावरण प्रेमी )कुमारी प्रणिला चिकटे, सामाजिक कार्यकर्त्या ताराबाई चहांदे , चंद्रपूर गडचिरोली ग्रामीण संपर्क प्रमुख दशरथ वाघमारे, प्रशिक्षक उपजीविका अभियान मार्गदर्शक अ.भा.ग्रा. पत्रकार संघाचे जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला माला अर्पण करून स्त्री शक्तीच्या जागरतेचे दीप प्रज्वलित करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .
प्रास्ताविक पर मनोगत शशिकांत मोकाशे यांनी केले . सूत्रसंचालन सुनिता अडबाले यांनी केले .
कार्यक्रम प्रसंगी ‘स्त्री शक्तीचा जागर “शालेय महाविद्यालय समूहाच्या कु.लीना ताजने विनिता ,जानवी, दीपिका, प्रिया, प्रणवी युवतींनी पथनाट्याच्या व नृत्य माध्यमातून सादरीकरण केले.
पर्यावरणा संदर्भात बोलताना प्रणाली चिकटे म्हणाली सायकलची दोन चाके व महाराष्ट्रातील २००तालुके भ्रमण करण्याची ताकद व प्रेरणा सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच मिळाली .
म्हणून मी संबंध महाराष्ट्र भ्रमण करू शकले . अध्यक्षीय भाषणातून स्त्री विषयक भूमिका मांडताना रवींद्र तिराणिक म्हणाले महिलांनी सक्षमपणे निर्भयपणे संघटित रित्या पुढे येऊन सामाजिक ,सांस्कृतिक ,कला साहित्य व उद्योग क्षेत्रात उत्तुंग भरारी घेण्यासोबतच आपले हक्क अधिकार यासंदर्भात जागृत असली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर होतंय असे म्हणावे लागेल .
कार्यक्रम प्रसंगी काही वर्षांपूर्वी एका रेल्वे अपघात हात गमावून अपंगत्व आलेल्या त्यानंतर समाजामध्ये निर्भयपणे व ठामपणे उभ्या राहून उद्योग क्षेत्रात उद्योगशील महिला म्हणून नावारूपास आलेल्या रत्ना सरकार यांचा सत्कार करण्यात आला .सत्काराला उत्तर देताना आपल्या मागील जीवनातील खडतर व दुःखदायी प्रसंग विशद करीत घेतलेली उंच भरारी याबाबत असंख्य महिलांसमोर सत्काराप्रसंगी आपले विचार मांडले.
कार्यक्रमात उपस्थित २००महिलांना हळदी कुंकू चे संक्रातीचे वाण म्हणून २००वृक्ष एकमेकींना भेट देत महिलांनी मोठ्या प्रमाणात समोर येऊन पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पुढे यावे हा संदेश या कार्यक्रमामधून देण्यात आला
.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रणय शुक्ला गोविंद मित्रा संजय रामटेके , शशी ठक्कर ,बाळू डांभारे, कैलाश चुनारकर यांनी सहकार्य केले.
तर रंजना समर्थ, पूजा लीना चंद्रागडे, सुनिता मोकाशे ,राजू चौरसिया ,राहुल ताकसांडे आदींनी अथक परिश्रम घेतले.

______________________________

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

________________________________

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here