* सर्वसामान्यांना न्याय देत शक्तीशाली भारत निर्माण करणारा अर्थसंकल्प – आ. किशोर जोरगेवार *

0
25

=======================

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला शितारमन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून कृषी, व्यापार, शिक्षण क्षेत्राला बळ मिळणार आहे. ७ लाखांपर्यंत उत्पन्नाला कर मुक्त करण्यात आले आहे. मच्छीमारांसाठी करण्यात आलेल्या मोठ्या निधीच्या तरतुदीमुळे शेतीसह जोडधंद्याला चालना मिळणारा असुन हा सर्वसामान्यांना न्याय देत शक्तीशाली भारत निर्माण करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली आहे.
रेल्वेच्या पायाभुत सुविधांसाठी 75 हजार कोटींची घोषणा अर्थसकंल्पात करण्यात आली आहे. तर एकलव्य शाळेत 38 हजार 800 शिक्षक भरती घेण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. कापूस उत्पादक शेतक-र्यांसाठी भरीव तरतुद करण्यात आली आहे. आदिवासींसाठी देशभरात विशेष शाळा सुरु करण्यात येणार आहे. याचा फायदा निश्चितच गडचिरोली आणि चंद्रपूर या आदिवासी बहुल जिल्हांना होणार आहे. अर्थसंकल्पात मच्छीमारांसाठी करण्यात आलेल्या 6 हजार कोटींच्या तरतुदीमूळे मच्छीमारी व्यवसायाला चालना मिळणार आहे. सोबतच शेतक-र्यांनाही शेतीपूरक जोडधंदा करण्यास याची मोठी मदत होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठीही अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. या अर्थसकंल्पातुन मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असुन हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, उद्योजग, मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आला असुन हा अर्थसंकल्प सामान्यांचा हिताच, देशाला विकासाच्या दिशेने देणार, शेतक-र्यांना सक्षम करणारा असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

===============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here