* माता रमाई जयंती निमित्य वैज्ञानिक दृष्टीकोन व जादूटोणा विरोधी कायदा प्रबोधन कार्यक्रम संपन्न *

0
16

========÷=÷÷÷÷÷========

जनहित बुद्ध विहार आणि रमाई महिला मंडळ गोपालपुरी चंद्रपूर यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई जयंती निमित्य वैज्ञानिक दृष्टीकोन चमत्कार प्रात्यक्षिक आणि जादूटोणा विरोधी कायदा यावर प्रबोधन कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव धनंजय तावाडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, जादूटोणाविरोधी कायदा, भूत ,भानामती, तंत्र, मंत्र ,जादूटोणा व बुवाबाजी आदी विषयांवर चमत्कार भंडा फोड प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनाली आंबेकर तर प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक प्रशांत दानव, कांबळे साहेब संगीता पानघाटे मंडळाचे पदाधिकारी सुचिताई मोडक, कल्पनाताई सोनावणे होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सोनल चांदेकर यांनी केले.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here