* पत्रकार बंधुंनो आपली नितीमत्ता जोपासूनच पत्रकारीता करा! *

0
32

====÷÷÷÷÷=÷======

*. चंद्रपुर- *  

=========÷===÷÷÷÷÷÷÷÷÷

सद्याच्या वर्तमान स्थितीचा आढावा घेतल्यास
दिवसेंदिवस पत्रकारांवर जनतेचा राेष वाढत असल्याचे दिसून येत असुन पूर्वी जो काही मानसन्मान पत्रकारांना मिळायचा ताे आजच्या घडीला मिळतांना दिसून येत नाही. सर्वच पत्रकारांवर हा राेष नसुन यात अनेक जन अपवादही आहेत. ज्या पत्रकारांनी आपली नितीमत्ता गमावली अश्या पत्रकारांवर मात्र जनतेचा राेष स्पष्ट दिसून येतो. यासाठीचे मुख्य कारणं असे की, सत्तेकरिता साम दाम दंड भेद जातीवाद,राजकारणात रस घेणाऱ्या पत्रकारांविषयी जनसामान्यात पत्रकारांनी आपली लेखनी गाहाण ठेवली की काय? अशी नेहमीच चर्चा हाेतांना दिसून येते. यासाठी पत्रकारांनी आपली थाेडी फार नितीमत्ता जपुन ठेवून कुनालाही न घाबरता किंवा कुनाच्याही दबावात न येता निर्भीडपणे आपली पत्रकारीता करणे गरजेचे आहे असे आवाहन पुराेगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे यांनी पुराेगामी पत्रकार संघाच्या पत्रकारांना केले आहे. पुर्वी दैनिक वृत्तपत्रात तथा ईलेक्ट्रानिक प्रसार माध्यमातुन शासन, प्रशासन, राजकारणातले भ्रष्ट्राचार जनते समाेर देशातला चाैथास्तंभ म्हणजेच पत्रकार उघडकिस आणायचे. त्यात जनतेवर हाेणार्‍या अन्याय अत्याच्यारांच्या विराेधात बातम्या प्रकाशित, प्रसारीत करून पत्रकार हा आपले कर्तव्य बजावत असे. मात्र आता तसे काहीच हाेतांना दिसत नाही. जनतेच्या समस्या, जनतेचे मुद्दे,शासन प्रशासनेचे भ्रष्ट्राचार याला दाबण्याचा प्रयत्न देशातिल काही मुख्य दैनिक वृत्तपत्र व प्रसार माध्यमाच्या पत्रकारांचा बाजुनेच हाेतांना दिसुन येत आहे. आजही देशातील जनतेला चाैथ्यास्तंभावर पुर्णपणे विश्वास आहे.

=========================

पत्रकारांनी राजकिय नेत्यांची चमचेगिरी, चापलुसगिरी, त्यांचा कागावा, त्यांनी केलेल्या उदघाटनाच्या वेळी कापलेल्या फित्या, निवडणुकीत दिलेले खाेटे आश्वासन, नेत्यांची स्तुती करणार्‍या बातम्यांचा प्रसार, प्रचार करण्यावर अवलंबुन न राहता पत्रकारांनी प्रामाणिकपणे आपल्या वृत्तपत्रात मुद्देसूद व भारदस्त लिखान करुन आजची खरी वास्तविकता काय आहे ती आपल्या प्रसारमाध्यमातून प्रसारीत करून जनतसमाेर आणायला हवी. दैनिक वृत्तपत्र असो वा इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यम असो ते जाहिरातींवर नक्कीच अवलंबुन असते यात तिळमात्र शंका नाही.पण जाहिरात मिळतंय म्हणून राजकारणातील भ्रष्ट्राचारी नेत्यांपूढे लाेटांगण घालुन त्यांची गुलामी पत्करने हे सुध्दा पत्रकारिता करणाऱ्यांना याेग्य ठरू शकत नाही. एक पत्रकार हा जनतेला दिशा देवु शकताे. जनतेत नवचैतन्य निर्माण करू शकताे निराश, हताश, झालेल्या शासनाच्या विविध याेजनांपासून वंचित असणाऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास आणू शकताे. तर दुसरा पत्रकार हा जनतेला दिशाहिनही करू शकताे हे नाकारता येत नाही. म्हणून पत्रकार बांधवांनी पत्रकारिता करतांना आजच्या घडीला आपली नितीमत्ता जपुन ठेवण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघ हा पुराेगामी महापुरूषांच्या विचाराला समाेर घेवुन जाणारा एकमेव संघ आहे. यापूढे तरी पत्रकारांनी आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहण्याचा निश्चय करावा असे मौलीक उद्गार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी यांनी केले असुन असाच निश्चय संघातील प्रत्येक पत्रकांरानी सुध्दा करायचा आहे असे मत पुराेगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव निलेश ठाकरे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी आपले मनाेगत व्यक्त करतांना केले. यावेळी कार्यक्रमाला स्थानिक पत्रकार, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित हाेते.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here