=======================
भरतीय जनता पार्टी हा देशभक्त निष्ठावान कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.येथे कार्यकर्ते व्यक्तिविशेषसाठी नाही तर ‘तेरा वैभव अमर रहे माँ,हम दिन चार रहे ना रहे,हे विचार अंगीकारून कार्य करतात.त्यामुळे भाजपा पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.ही स्थिती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची नाही.नेते गेले की कार्यकर्ते पण पक्ष सोडतात.हीच त्यांची परंपरा आहे.म्हणून आता पक्ष टिकविण्यासाठी शिवगर्जना यात्रा केली जात आहे.या यात्रेत शिवसेना(ठाकरे)चे नेते भाजपावर बिनबुडाचेआरोप करीत फिरत आहे.हेच दुष्कृत्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी चंद्रपूर येथे केले.शिवगर्जना करणे सोडून,त्यांनी पुरावे नसताना लोकनेते,कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या पराभवाला जवाबदार सांगितले.हे सांगतांना ते,याचा ठोस पुरावा नाही असेही वक्तव्य केले.यावरून असे दिसते की खैरेंनी हे कृत्य प्रसिद्धीसाठी केले आहे.हा विशुद्ध मूर्खपणा आहे.खैरेंनी आरोप करावे व जनतेनी ते स्वीकारावे इतकी येथील जनता अज्ञानी नाही.भाजपाच्या नेत्यांवर दोषारोपन करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना मोठी होऊ शकत नाही.हे निर्विवाद सत्य आहे.
=========================≠