चंद्रकांत खैरें यांचे आरोप केवळ प्रसिद्धीसाठीच

0
26

======================

भारतीय जनता पार्टी हा देशभक्त निष्ठावान कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.येथे कार्यकर्ते व्यक्तिविशेषसाठी नाही तर ‘तेरा वैभव अमर रहे माँ,हम दिन चार रहे ना रहे,हे विचार अंगीकारून कार्य करतात.त्यामुळे भाजपा पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे.ही स्थिती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची नाही.नेते गेले की कार्यकर्ते पण पक्ष सोडतात.हीच त्यांची परंपरा आहे.म्हणून आता  पक्ष टिकविण्यासाठी शिवगर्जना यात्रा केली जात आहे.या यात्रेत शिवसेना(ठाकरे)चे नेते भाजपावर बिनबुडाचेआरोप करीत फिरत आहे.हेच दुष्कृत्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी चंद्रपूर येथे केले.शिवगर्जना करणे सोडून,त्यांनी पुरावे नसताना लोकनेते,कॅबिनेट मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या पराभवाला जवाबदार सांगितले.हे सांगतांना ते,याचा ठोस पुरावा नाही असेही  वक्तव्य केले.यावरून असे दिसते की खैरेंनी हे कृत्य प्रसिद्धीसाठी केले आहे.हा विशुद्ध मूर्खपणा आहे.खैरेंनी आरोप करावे व जनतेनी ते स्वीकारावे इतकी येथील जनता अज्ञानी नाही.भाजपाच्या नेत्यांवर दोषारोपन करून उद्धव ठाकरे यांची शिवसेना मोठी होऊ शकत नाही.हे निर्विवाद सत्य आहे.
भारतीय जनता पार्टीला गद्दार म्हणण्यापूर्वी त्यांनी पक्ष प्रमुखाला विचारावे,की शिवसैनिकाला मुख्यमंत्री का केले नाही…?तसे झाले असते तर,शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातात गेलीच नसती.चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या घरात लागलेली आग विजवावी उगाच भाजपाच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करून इकडे आग लावण्याचा प्रयत्न करू नये.त्यांचे हे प्रयत्न कुचकामी ठरणार आहेत.कारण की,भाजपाच्या कार्यकर्त्यांची निष्ठा व बांधिलकी पक्ष प्रमुखाप्रति नसून भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणांसोबत आहे.पक्षप्रेमापोटी कार्यकर्ते अहोरात्र झटत असतात.चंद्रकांत खैरचें वक्तव्य भाजपाच्या कार्यकर्त्यांचाच नाही तर इतरही पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विश्वासघात  व अपमान करणारे आहे. नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर खोटा आरोप करणे हीच शिवगर्जना असेल तर उद्धव ठाकरे शिवसेनेचा अंत जवळ आला असे समजायचे.

डॉ.मंगेश गुलवाडे
जिल्हाध्यक्ष
भाजपा महानगर,चंद्रपूर

=======================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here