====================
* अधिवेशनात बोलतांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समस्यांकडे वेधले सभागृहाचे लक्ष.. *.
=======================
* चंद्रपूरातील *.
=======================
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे समस्यांचे डोंगर आहे. पाणी नाही म्हणून चार दिवस मोतिया बिंदुची शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेली. या प्रकरणात दोषीं अधिका-र्यांवर कार्यवाही करणार आहात का असा प्रश्न आज अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला असुन येथील समस्यांबाबत बैठकीचे आयोजन करण्याची मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलतांना केली आहे.
===========================
चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची दुरावस्था लपलेली नाही. आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर रुग्णालयाची पाहणी केली असता. पाणी नसल्याने मोतिया बिंदुवरील शस्त्रक्रिया चार दिवस पूढे ढकलल्या गेल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता. हाच विषय आज आमदार किशोर जोरगेवार यांनी उचलुन धरला. यावर लक्षवेधी उपस्थित केली. हा प्रकार अतिषय गंभिर असुन या बेजबाबदार पणाला जबाबदार असलेल्या दोषी अधिका-र्यांवर कार्यवाही करणार आहात का असा प्रश्न यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला. सोबतच सदर महाविद्यालयात काम करत असलेल्या कंटात्री कर्मचा-र्यांचा कंत्राट संपला मात्र या कंत्राटाराला मुदतवाढ न मिळाल्याने या 336 कर्मचा-र्यांचा मागील पाच महिण्यांचा पगार थकीत आहे. त्यामुळे कंत्राटदाराला मुदत वाढ देऊन तात्काळ त्यांचे वेतन अदा करण्यात यावे अशी मागणीही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यावर उत्तर देतांना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी सदर कंत्राट वाढवून दोन ते तिन दिवसात कर्मचा-र्यांचे वेतन अदा केले जातील असे सांगीतले आहे. येथील कर्मचा-र्यांनी डेरा आंदोलन सुरु केले आहे. या कर्मचा-र्यांच्या वेतनासाठी 10 कोटी 50 लक्ष रुपयांची गरज असतांना आपण फक्त दिड कोटी रुपये दिले आहे. यातीलही केवळ 90 लक्ष रुपयेच प्राप्त झाले असल्याचे यावेळी त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणुन दिले. आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आमदार नाना पटोले, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार देवराव होळी यांनी बोलतांना उपस्थित केलेला प्रश्न योग्य असल्याचे सांगत सदर महाविद्यालयाच्या औषध साठ्याचा अभाव व इतर गैरसोयीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793