*शेती विकास आखणारा अर्थसंकल्प : विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे*

0
51

=========================

*ओबिसींसाठी पहिल्यांदाच दहा लाख घरे बांधून देणार असल्याच्या घोषणेचे स्वागत*   

==========================÷

* चंद्रपूर : *

===========

शिंदे फडणविस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. राज्याचा सर्वांगीण विकास साधणारा हा अर्थसंकल्प आहे.

शेती, मुली व महिला, अंगणवाडी सेविका, आरोग्य क्षेत्र, ज्येष्ठ नागरीक, आदींसाठी भरीव योजनांचा विचार या अर्थसंकल्पात केलेला आहे. इतर मागासवर्गीयांसाठी अमृतमहोत्सवी वर्षात पहिल्यांदाच दहा लाख घरे बांधणार असल्याची घोषणा या अर्थसंकल्पात केलेली आहे.

========================

शेतीविकासावर मोठ्या प्रमाणात भर दिला गेला आहे. शेतकऱ्यांसाठी महाकृषी विकास अभियान, राज्याच्या विकासासाठी निती आयोगाच्या धर्तीवर मित्र संस्थेची स्थापना, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा काढता येईल, शेतकऱ्यांच्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार, धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानात वाढ, सेंद्रिय शेतीला चालना, उपग्रह आणि संगणकाची मदत घेवून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ई-पंचनामे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांच्या वार्षिक मदतीत वाढ, एकात्मिक पीक आधार आराखडा, मागेल त्याला शेततळ व ठिबक, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेची घोषणा, मच्छीमारांसाठी ५० कोटींचा मत्स्यविकास कोष, नदीजोड प्रकल्प, गोसीखुर्दसाठी १५०० कोटीचा निधी, रखडलेले जलप्रकल्प पूर्ण करणार, जलयुक्त शिवार योजना दोनची सुरुवात, मुलींसाठी लेक लाडकी योजना, पिडीत महिलांसाठी शक्तीसदन, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतील निधीत भर, ज्येष्ठांना वैद्यकीय सुधारणा, आपला दवाखाना राज्यभर, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, साखळी व्यवस्थापन प्रणाली, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, आदी योजनेत वाढ, आदिवासी आश्रम शाळांना आदर्श शाळा करण्याची योजना, टॅक्सी, रिक्षाचालक, असंघटीत कामगार यांच्या विकासासाठी महामंडळाची स्थापना, रस्ते आणि पुलांच्या प्रकल्पा निधी, मातोश्री ग्राम समृध्दी पांदन योजनेत नव्या योजनांचा समावेश, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचा पुढील टप्पा सुरू, बिरसामुडा, संत सेवालाल जोडरस्ते योजना, गोंडवाना विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळणार, आदी सर्वसमावेशक भरीव अशा विकास कामांचा हा अर्थसंकल्प आहे.

======================

राज्यातील सर्व कल्याणकारी योजनेत केलेली भरीव वाढ व नवीन योजनांची निर्मिती या अर्थसंकल्पात सांगण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पात पहिल्यांदा इतर मागासवर्गीयांचा विचार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस राज्य सरकारचा हा अर्थसंकल्प राज्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे, असे विदर्भवादी ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.

===================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here